भारतीय क्रिकेट संघ सध्या ब्रेकवर आहे. तर आता टीम इंडिया 19 सप्टेंबरपासून बांग्लादेश विरुद्ध कसोटी मालिका खेळताना दिसणार आहे. आयपीएल 2024 पासून टीम इंडियाने कसोटी क्रिकेट खेळला नाही. या कारणास्तव बरेच वरिष्ठ खेळाडू दुलीप ट्रॉफी 2024 मध्ये त्यांची लय मिळविण्यासाठी खेळताना पहायला मिळणार आहेत. जे की 5 सप्टेंबरपासून सुरू होईल. विराट कोहली आणि रोहित शर्मा या स्पर्धेत भाग घेणार नाहीत. परंतु माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला वाटते की दोन्ही दिग्गजांनी दुलीप ट्रॉफी खेळायला हवी होती. यामुळे त्यांना एक महत्वाची मालिका खेळण्यापूर्वी लय मिळविण्यात मदत होईल.
तथापि, रैनाने कबूल केले की प्रत्येक खेळाडूला वेळोवेळी आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवणे देखील तितकेच आवश्यक आहे. तो म्हणाला की रोहित आणि कोहली दोघांनाही बांग्लादेश आणि न्यूझीलंडविरूद्ध आगामी कसोटी मालिकेसाठी कोण कोणत्या तयारी करायच्या आहेत. ह त्यांना माहित आहे.
अलीकडेच झालेल्या संभाषणादरम्यान रैना म्हणाला, “त्यांनी (रोहित-विराट) खेळायला हवे होते. ते आयपीएल नंतर कोणतेही रेड बॉल (कसोटी) क्रिकेट खेळले नाही. जर तुम्ही एक मोठी मालिका खेळणार असाल तर, त्याआधी तुम्ही रेड बॉल (कसोटी) क्रिकेट खेळणे गरजेचे आहे. मला वाटते की ते (रोहित-विराट) वरिष्ठ आहेत. एकदा ते पुन्हा सर्व संघसमवेत मैदानात उतरल्यावर सराव कसा करावा हे त्यांना माहित आहे. कधीकधी कुटुंबासमवेत वेळ घालवणे देखील खूप महत्वाचे असते.”
दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीत 4 संघ सहभागी होतील. या कालावधीत एकूण 6 चार दिवसांचे सामने असतील. टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू घरगुती खेळाडूंसह स्पर्धेत भाग घेतील. यामध्ये श्रेयस अय्यर, केएल राहुल, शुबमन गिल, यशसवी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव यांसारख्या अनेक खेळाडूंची नावे समाविष्ट आहेत.
यापूर्वी एका अहवालात असे म्हटले होते की, रोहित आणि विराटसुद्धा दुलीप ट्राॅफीमध्ये सहभागी होतील. परंतु टीम इंडियाला आगमी काळात दोन कसोटी मालिका खेळायची आहे. त्यासाठी बीसीसीआयला या दोन सीनियर खेळाडूंना पूर्ण आराम मिळावे अशी इच्छा आहे. वर्षाच्या अखेरीस भारताला ऑस्ट्रेलिया दाैरा देखील करायचा आहे. यावेळी ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ हॅट्ट्रीक करण्याचा प्रयत्न करेल.
हेही वाचा-
दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूनं उडवली सूर्यकुमार यादवच्या कॅचची खिल्ली; म्हणाला, “जर वर्ल्ड कप फायनलमध्ये….”
चाहत्यांसाठी वाईट काळ, एका आठवड्यात तब्बल 5 खेळाडूंचा क्रिकेटला अलविदा!
विकेट घेतल्यानंतर जमिनीवर लोळायला लागली, महिला खेळाडूचं हे कसलं अनोखं सेलिब्रेशन!