Team India Jersey : भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेशी दोन हात करण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. उभय संघ नवा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्त्वाखाली 27 जुलैपासून पल्लेकल्ले मैदानावर श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघाच्या जर्सीत एक बदल पाहायला मिळेल. या जर्सीची खासियत असतील, त्यावरचे स्टार्स. या वाढलेल्या स्टार्समुळे भारतीयांची छाती अभिमानाने फुगेल!
टीम इंडियाने नुकतेच टी20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 17 वर्षांनंतर टी20 चॅम्पियन बनला. हे यश प्रतिबिंबित करण्यासाठी भारतीय संघाने आता त्यांच्या जर्सीत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.
खरं तर, आता भारतीय संघाच्या टी20 जर्सीवर बीसीसीआयच्या लोगोच्या वर एक ऐवजी दोन स्टार दिसतील. श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी भारतीय खेळाडूंचे फोटोशूट करण्यात आले आहे. या फोटोशूटमधील फोटो वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि खलील अहमद यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये त्यांनी घातलेल्या जर्सीवर दोन स्टार दिसत आहेत. हे दोन स्टार्स भारतीय संघाने दोनदा टी20 विश्वचषक जिंकल्याचे दर्शवतील.
Recharged and raring to go. See you on the pitch 🇮🇳💙 pic.twitter.com/mpCBXe7XFk
— Mohammed Siraj (@mdsirajofficial) July 25, 2024
View this post on Instagram
भारताच्या वनडे संघाच्या जर्सीवर देखील दोन स्टार्स आहेत. कारण वनडे फॉरमॅटमध्ये भारतीय संघाने 1983 आणि 2011 मध्ये विश्वचषक जिंकला आहे.
झिम्बाब्वे दौऱ्यावर भारतीय संघाच्या जर्सीमध्ये दोन स्टार्स का दिसले नाहीत?
टी20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय संघ लगेचच झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला होता. मात्र त्यावेळी भारतीय खेळाडूंच्या जर्सीवर एकच स्टार दिसला होता. यामागचे कारण म्हणजे, टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यापूर्वीच भारतीय संघाचे काही खेळाडू झिम्बाब्वे दौऱ्यावर रवाना झाले होते. त्यामुळे त्यांनी अंतिम सामन्यापूर्वी डिझाइन केलेली जर्सी घातली होती. त्यामुळेच त्या मालिकेत भारतीय खेळाडूंच्या जर्सीवर दुसरा स्टार दिसला नव्हता.
महत्त्वाच्या बातम्या-
या 2 स्टार्सपैकी कोणाला प्लेइंग 11 मध्ये स्थान? श्रीलंकेमालिकेपूर्वी हेड कोच गंभीरसमोर मोठे आव्हान
“धोनीचं नाव कधी ऐकलं नाही” इंग्लंडमधील स्पोर्ट्स कंपनीच्या वक्तव्यानं चाहत्यांमध्ये उडाली खळबळ
अर्शदीप सिंगचं नशीब उजळलं, निवडकर्ते देणार कसोटी मालिकेत मोठी संधी?