आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ न्यूयाॅर्कला पोहचला आहे. भारतीय फॅन्स सोबत जगभरातील क्रिकेट प्रेमींसाठी पुढील महिना चांगलाच पर्वणी ठरणार आहे. म्हणजेच 2 जून पासून आयसीसी टी 20 विश्वचषक 2024 ला सुरुवात होणार आहे. यंदाच्या विश्वचषकाचे यजमानपद वेस्ट इंडीज आणि अमेरिका भूषवणार आहे. विश्वचषकातील सुरुवातीचे काही सामने अमेरिकेत होणार आहेत.
टी-20 विश्वचषकापूर्वी भारताचा माजी फलंदाज वसीम जाफरने सोशल मीडियावर पोस्ट करत भारतीय संघाला मोलाचा सल्ला दिला आहे. सलामीला रोहित शर्माच्या जागी विराट कोहली आल्यास, जयस्वाल आणि कोहलीची जोडी टीम इंडीयास फायद्याची ठरु शकते. 3 आणि 4 क्रमांकावर रोहित शर्मा-सुर्यकुमार यादव फलंदाजीला आल्यास टीम इंडीयाची फलंदाजी मजबूत बनेल. असं तो म्हणाला.
Kohli & Jaiswal should open in the World Cup imo. Rohit & SKY should bat 3&4 depending on the start we get. Rohit plays spin really well so batting at 4 shouldn’t be a concern. #T20WorldCup #INDvPAK #INDvIRE pic.twitter.com/nMgwwaDNXb
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) May 29, 2024
विराट कोहली टीम इंडीयसाठी तिन्ही फाॅरमॅट मध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. पण आयपीएलमध्ये आरसीबीसाठी सलामी करतो. नुकताच पार पडलेल्या आयपीएल 2024 मध्ये तूफानी फलंदाजी केली होती. स्पर्धेत सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता. हंगामात आक्रमक फलंदाजी करत त्याने 154.70 च्या स्ट्राईक रेटने 741 धावा केल्या आहेत.
तर दुसरीकडे रोहित शर्मा तिन्ही फाॅरमॅट मध्ये ओपनिंग करतो. शिवाय रोहित शर्माचे सलामी व्यतीरिक्त आकडेवारी ही खराब आहे. पण रोहित फिरकीपटू विरुद्ध चांगला खेळतो त्यामुळे चाैथ्या क्रमांकावर फलंदाजी करणे ही त्याच्यासाठी फार चिंताजनक बाब सहसा नसावी. अशा परिस्थितीत टीम इंडिया टी-20 विश्वचषकासाठी कोणत्या कॉम्बिनेशनसह खेळणार आणि संघाची फलंदाजी क्रमवारी काय असणार हे पाहणे रोचक ठरणार आहे.
टीम इंडीया 5 जून पासून विश्वचषक मोहीमेला सुरुवात करणार आहे. पहिला सामना 5 जून रोजी आयर्लड विरुध्द तर 9 जून रोजी भारताचा सामना पाकिस्तान विरुध्द रंगणार आहे. त्याआधी 1 जून रोजी भारत आणि बांग्लादेश यांच्यात सराव सामना खेळला जाणार आहे.
महत्तवाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघासोबत ‘हा’ दिग्गज खेळाडू झाला सहभागी
टी20 विश्वचषकात ‘हे’ 5 युवा खेळाडू घालतील धुमाकुळ
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल