भारत विरुद्ध झिम्बाब्वे (IND vs ZIM) य़ा दोन संघात होणारी ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका १८ ऑगस्टपासून खेळली जाईल. या दौऱ्यासाठी टीम इंडिया शनिवारी (१३ ऑगस्ट) पहाटे झिम्बाब्वेला रवाना झाली आहे. यादरम्यान टीम इंडियाने त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर खेळाडूंचे फोटो शेअर केले आहेत. त्याचवेळी व्हीव्हीएस लक्ष्मण, संजू सॅमसन आणि शिखर धवनसह अनेक खेळाडू या फोटोंमध्ये दिसत आहेत.
टीम इंडिया झिम्बाब्वेला रवाना झाली
बीसीसीआयने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर संघाच्या प्रस्थानाची पुष्टी केल्यानंतर षनिवारी पहाटे उशिरा खेळाडू त्यांच्या फ्लाइटमध्ये चढताना दिसले. शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, मोहम्मद सिराज यांसारखे खेळाडू तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी झिम्बाब्वेला जाताना दिसले. राहुल द्रविड आशिया चषक स्पर्धेच्या तयारीत सहभागी होणार असल्याने व्हीव्हीएस लक्ष्मण देखील भारतीय संघाचा एक भाग होता.
https://www.instagram.com/p/ChLUUh7vhhN/?utm_source=ig_web_copy_link
या फोटो मध्ये सलामीवीर फलंदाज शिखर धवनचा एक फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावर जाण्यापूर्वी शिखर धवनने त्याच्या फेसबुक स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला ज्यामध्ये तो विमानतळावर झोपलेला दिसत होता. सध्या हा फोटो सोशल मिडीयावर बराच शेअर होत आहे.
जिम्बाब्वे दौरे से पहले शिखर धवन।#indvszim pic.twitter.com/otUfo0TnIJ
— lokeshkhera (@lokeshkhera29) August 13, 2022
दरम्यान, दोऱ्यासाठी कर्णधार असणाऱ्या केएल राहुलसाठी हा दौरा खूप महत्वाचा असेल कारण आगामी आशिया कप २०२२ साठी स्वतःला तयार करण्याची ही शेवटची संधी आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला शिखर धवनच्या जागी राहुलला या दौऱ्यासाठी कर्णधार बनवण्यात आले होते. कारण त्याने त्याची फिटनेस टेस्ट पास केली होती. विशेष म्हणजे राहुल तेट ७ महिन्यांच्या मोठ्या कालावधीनंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. मध्यंतरीच्या काळात त्याला अनेक शारीरिक अडचणींचा सामना करावा लागला होता. आता त्याला संघात संथान मिळताच कर्णधारपद सोपावण्यात आल्याने अनेकांनी बीसीसीआयवर प्रश्नचिन्हे उप्स्थि केले आहेत.
भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी दोन्ही संघ
भारत: केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उप-कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर.
झिम्बाब्वे: रेगिस चकाब्वा (कर्णधार), तनाका चिवांगा, ब्रॅड इवान्स, ल्यूक जोंगवे, इनोसंट काया, ताकुदजवानाशे कैटानो, क्लाइव मडांडे, वेस्ली मेडवेरे, तदीवानाशे मारुमनी, जॉन मसारा, टोनी मुनयोंगा, रिचर्ड एनगारवा, विक्टर न्याउची, सिकंदर रझा, मिल्टन शुम्बा, डोनाल्ड तिरिपानो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या रंगात रंगला धोनी, ‘भारतीय असल्याचा अभिमान’ म्हणत जिंकले काळीज
जेव्हा पाकिस्तानी यष्टीरक्षकाला मारायला निघालेला गौतम गंभीर, पण कॅप्टनकुलने शांत केलेले वातावरण
अगग! पाकिस्तान बोर्डाने वाढवली खेळाडूंची पगार, तरीही भारतीयांच्या तुलनेत आहेत खूपच मागे