कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक वर्ष पुढे ढकलला गेलेला टी२० विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती (युएई) व ओमान येथे खेळला जाणार आहे. टी२० विश्वचषकात भारतीय संघ २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडूंना सराव सामना खेळण्याची संधीही मिळणार आहे. विश्वचषकापूर्वीच्या सराव सामन्यांचे वेळापत्रक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नुकतेच जाहीर केले.
या संघांविरुद्ध भारत खेळणार सराव सामना
भारतीय संघ विश्वचषकातील आपला पहिला सामना खेळण्यापूर्वी दोन सराव सामने खेळेल. भारतीय संघ इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामने खेळणार आहे. इंग्लंडविरुद्धचा सराव सामना १८ ऑक्टोबरल तर, ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सराव सामना २० ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. १८ ऑक्टोबर रोजी इंग्लंड विरुद्ध दुबई होणारा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:२० पासून खेळला जाईल. त्याचबरोबर भारताचा दुसरा सराव सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध २० ऑक्टोबर रोजी दुपारी ३:३० वाजता सुरू होईल.
असे असेल भारताच्या सामन्यांचे वेळापत्रक
विश्वचषकातील भारताचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता खेळले जातील. सुपर १२ चा पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात, तर दुसरा सामना त्याच दिवशी इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात होईल. भारत आणि पाकिस्तान यांना विश्वचषकात ब गटात ठेवण्यात आले आहे.
भारत २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध आपल्या विश्वचषक मोहिमेचा प्रारंभ करेल. हा सामना दुबई येथे होणार आहे. त्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड विरुद्ध दुबई येथेच तर, ३ नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तान विरुद्ध अबुधाबी येथे भारताचे सामने होतील. यानंतर भारत ७ व ९ ऑक्टोबर रोजी पात्रता फेरीतील विजेत्या संघांशी दोन हात करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
चौतीस वर्षीय रोहितनंतर ‘या’ युवकांवर असेल टीम इंडियाची मदार, रांगेत एकाहून एक बहाद्दर शिलेदार
भारताच्या टी२० विश्वचषकात अदलाबदलीची शक्यता, आयपीएल प्रदर्शनावर अवलंबून असेल ‘या’ खेळाडूंचं नशीब