भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये ३ सामन्यांची टी२० मालिका (IND vs SL T20) सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आहे. शनिवारी (२६ फेब्रुवारी) या दोन संघांमध्ये हिमाचल प्रदेशच्या धरमशाला येथे दुसरा टी२० सामना पार खेळला जात आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला ६२ धावांनी पराभूत केले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर बीसीसीआयने श्रीलंकेविरुद्धच्या टी२० आणि कसोटी मालिकेसाठी १८ खेळाडूंच्या संघाची घोषणा केली. रोहित शर्मा सर्व सामन्यांमध्ये विविध बदल करताना दिसत आहे. त्याने एका अशा खेळाडूला निवडले आहे, जो चौथ्या स्थानावर चांगली फलंदाजी करू शकतो. या खेळाडूला माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) गोलंदाजीसाठी ७ व्या किंवा ८ व्या स्थानावर पाठवत होता.
भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या टी२० पहिल्या सामन्यात रोहितने खूप काळानंतर संघात पुनरागमन केलेल्या रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले. त्याच्या या निर्णयाने संघाच्या प्रशिक्षकांसह अनेक खेळाडू चकित झाले आहेत. कारण, या सामन्यात खूप काळानंतर पुनरागमन करणारा भारताचा सलामीवीर संजू सॅमसन त्याच्या फलंदाजीची वाट पाहत होता. मात्र, त्याच्या जागी रोहितने जडेजाला संधी दिल्याने त्याच्या निर्णयाने संघाच्या प्रशिक्षकासह अनेक खेळाडूंना आश्चर्य वाटले.
या सामन्यातील विजयानंतर रोहित जडेजाबद्दल म्हणाला की, “रवींद्र जडेजाच्या पुनरागमनामुळे मी खूप खुश आहे. आम्हाला त्याचा संघात जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा आहे. त्यामुळे त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले आणि तुम्ही येत्या सामन्यांमध्येही हेच पाहाल. एक फलंदाज म्हणून तो खूप सुधारला आहे. तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. कसोटी क्रिकेटनंतर आम्हाला त्यांचा वापर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये करायचा आहे.”
गेल्या ३ वर्षांपासून मधल्या फळीमध्ये खेळत आहे. टी२० विश्वचषकापूर्वी मधल्या फळीत सुधारणा करण्यासाठी रोहितने अनेक फलंदाजांना संधी दिली आहे. भारताकडे मधल्या फळीत दोन फलंदाज आहेत, जे चांगली फलंदाजी करू शकतात. यामध्ये तिसऱ्या क्रमांकासाठी विराट कोहली आणि त्याच्या अनुपस्थितीत श्रेयस अय्यरचे नाव आहे. चौथ्या क्रमांकासाठी फलंदाजाचा शोध सुरू आहे. अशा स्थितीत रवींद्र जडेजाला संधी देऊन कर्णधार रोहित शर्मा त्याला चौथ्या क्रमांकावर बसवण्याचा प्रयत्न करत आहे.
या टी२० सामन्यात जडेजाने दुखापतीतून सावरून जवळपास दोन महिन्यांनी संघात पुनरागमन केले आहे. या सामन्यात जडेजाला फक्त ४ चेंडू खेळण्याची संधी मिळाली, त्यामध्ये त्याने 3 धावा केल्या. जडेजाने यशस्वी गोलंदाजी केली आणि त्याच्या ४ षटकात २८ धावा दिल्या आणि एक विकेट घेतली.
जडेजाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघातून अष्टपैलू म्हणून केली होती. यानंतर २००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या सत्रात त्याला राजस्थान रॉयल्स संघात खेळण्याची संधी मिळाली. आयपीएलमधील त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे त्याला २००९ मध्ये भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली. ८ फेब्रुवारी, २००९ रोजी त्याने एकदिवसीय फॉर्मेटमध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केले. १० फेब्रुवारी, २००९ ला त्याने टी२० फॉरमॅटमध्ये पदार्पण करताना श्रीलंकेविरुद्ध पहिला सामना खेळला. रवींद्र जडेजाने एकदिवसीय सामन्यांमध्ये १६८ सामने खेळताना २४११ धावा आणि १८८ विकेट घेतल्या आहेत, तर टी२० मध्ये त्याने एकूण ५६ सामने खेळले असून २५९ धावा आणि ४७ विकेट घेतल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
पहिल्या टी२०तील पराभवानंतर श्रीलंकेला दुहेरी धक्का! ‘हे’ २ खेळाडू भारताविरुद्धच्या मालिकेतून बाहेर
केव्हा, कुठे आणि कसा पाहाल भारत विरुद्ध श्रीलंका पहिला टी२० सामना? जाणून घ्या एका क्लिकवर





