जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना व इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची ‘हाय प्रोफाईल’ मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ ३ जून रोजी इंग्लंडमध्ये दाखल झाला. तीन दिवस विलगीकरणात राहिल्यानंतर भारतीय खेळाडू मैदानावर उतरले असून त्यांनी सरावाला सुरुवात केली आहे. त्याचवेळी खेळाडूंसाठी तयार केलेल्या बायो-बबलविषयी एक महत्त्वपूर्ण खुलासा झाला आहे.
भारतीय खेळाडू होणार बायो-बबल बाहेर
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या जगभरात खेळांच्या स्पर्धा व मालिकांसाठी बायो-बबल तयार केले जाते. या बायो-बबलमध्ये खेळाडूंव्यतिरीक्त प्रशिक्षक व काही निवडक कर्मचाऱ्यांना राहण्याची परवानगी देण्यात येते. खेळाडू या काळात सामान्यपणे जीवन जगू शकत नाहीत. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय खेळाडू जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर बायो-बबलचा भाग नसतील, असे भारतीय गोटातून सांगण्यात येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ‘जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर तब्बल ४० दिवस भारतीय संघाला कोणताही सामना खेळायचा नाही. या काळात खेळाडू बायो-बबलचा भाग नसतील. त्यानंतर, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघ पुन्हा बायो-बबलमध्ये येईल.’ भारतीय खेळाडूंना या दौऱ्यावर आपल्या कुटुंबीयांना घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
भारताचा प्रदीर्घ दौरा
भारतीय संघ या दौऱ्यावर सर्वप्रथम न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात साउथॅम्प्टन येथील रोज बाऊल मैदानावर खेळेल. हा सामना १८ ते २२ जून या कालावधीत खेळला जाणार आहे. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. भारतीय महिला संघ देखील इंग्लंड दौऱ्यावर असून ते एक कसोटी व प्रत्येकी ३ वनडे व ३ टी२० सामने खेळतील. हे सर्व सामने ब्रिस्टल येथे हॅम्पशायरच्या मैदानावर खेळविण्यात येणार आहेत.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ:
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुबमन गिल, मयंक अगरवाल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हनुमा विहारी, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा व मोहम्मद सिराज.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलची पहिलीवहिली सुपर ओव्हर टाकणारा गोलंदाज आता करतो तरी काय? घ्या जाणून
टी१० क्रिकेटमध्ये फलंदाजाचा कहर विक्रम, अवघ्या २८ चेंडूत झळकावले तूफानी शतक
जेव्हा किवी गोलंदाजाने सचिन-द्रविडला अडकवले रिव्हर्स स्विंगच्या जाळ्यात, सचिनने लढवली ‘ही’ शक्कल