काही दिवसांपुर्वी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना पार पडला. या सामन्यात पाहुण्या इंग्लंडने दमदार कामगिरी करत यजमान भारतीय संघाला २२७ धावांनी नमवले. यासह भारतीय संघ मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आला आहे. या पराभवानंतर भारताच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची समीकरणेही बदलली आहेत.
शनिवारपासून (१३ फेब्रुवारी) भारत आणि इंग्लंड संघात चेन्नई येथे दुसरा कसोटी सामना होणार आहे. या सामन्याच्या निकालावर भारतीय संघाचे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतील स्थान अवलंबून असणार आहे.
न्यूझीलंड संघाने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आधीच प्रवेशही केला आहे. त्यामुळे आता अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी केवळ १ जागा शिल्लक असल्याने चुरस वाढली आहे. सध्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी ३ संघात स्पर्धा आहे; हे तीन संघ म्हणजे भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया.
भारताची चौथ्या क्रमांकावर घसरण
इंग्लंडने भारताविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या विजयानंतर सध्यातरी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत ७०.२ टक्क्यांसह अव्वल क्रमांक मिळवला आहे. तर भारतीय संघ सध्या ६८.३ टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. त्याचवेळी न्यूझीलंडचा संघ पाच मालिकांनंतर ११ सामन्यातील ७०.० अशा विजयाच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया ६९.२ टक्केवारीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
भारताला जिंकावा लागणार दुसरा कसोटी सामना
भारताने जर इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका २-१ किंवा ३-१ अशा फरकाने जिंकली; तर भारतीय संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दाखल होऊ शकतो. म्हणजेच इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताने कमीत कमी २ सामने जिंकून विजय मिळवणे आवश्यक आहे.
दुसरीकडे इंग्लंडचा विचार करता, त्यांना कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी भारताला कसोटी मालिकेत ३-१, ३-० किंवा ४-० अशा फरकाने पराभूत करावे लागणार आहे. म्हणजे त्यांना भारताविरुद्ध कसोटी मालिकेत कमीत कमी ३ सामने जिंकूनच विजय मिळवावा लागणार आहे.
अशात जर भारताने दुसरा कसोटी सामना गमावला तर ते मालिकेत ०-२ ने मागे पडतील. यासह कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम शर्यतीतूनही भारत बाहेर पडेल. कारण कसोटी मालिकेतील अखेरचे दोन्ही सामने जिंकले तरी भारत २-१ किंवा ३-१ ने मालिका जिंकू शकणार नाही.
Qualification scenarios for the #WTC21 finals:
India can still qualify if…
🇮🇳 2-1
🇮🇳 3-1England qualify if…
🏴 3-0
🏴 3-1
🏴 4-0Australia qualify if…
🏴 1-0
🏴 2-0
🏴 2-1
🤝 1-1
🤝 2-2— ICC (@ICC) February 9, 2021
अशात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल की, भारतीय संघ दुसऱ्या कसोटीत चेन्नईला पराभूत करत कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारेल का नाही?.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2021: वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी मिळवली लिलावात जागा, आता रोहितचा संघ लावणार मोठी बोली?
INDvsENG : प्रेक्षकांना मिळणार स्टेडियममध्ये प्रवेश; पण तिकीट विक्रीवेळीच उडालेत नियमांचे तीन-तेरा
भज्जी, केदारसह ‘या’ खेळाडूंसाठी पडणार पैशांचा पाऊस; हजार-लाख नव्हे तर २ कोटींपासून सुरू होणार बोली