---Advertisement---

या कारणामुळे टीम इंडियाला कसोटीतील अव्वल स्थान कायम राखण्याचे आव्हान

---Advertisement---

क्रिकेटमध्ये सध्या अनेक संघ कसोटी मालिकेत व्यस्त आहेत. यामुळे येत्या दोन महिन्यानंतर संघाच्या आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठे बदल दिसून येण्याची शक्यता आहे. त्याचमुळे पहिल्या स्थानावर असलेल्या भारतीय संघालाही अव्वल स्थान टिकवण्याचे आव्हान आहे.

सध्या भारतीय संघ कसोटी क्रमवारीत 116 गुणासंह पहिल्या स्थानावर आहे. तर श्रीलंकेला व्हाइटवॉश देणारा इंग्लंडचा संघ 108 गुणासंह दुसऱ्या स्थानावर आहे.

तसेच दक्षिण आफ्रीका 106 गुणासंह तिसऱ्या, ऑस्ट्रेलिया 102 गुणासंह चौथ्या आणि न्यूझीलंड 101 गुणासह पाचव्या स्थानावर आहे.

जर ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध 6 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या चारही कसोटी सामन्यात विजय मिळवला आणि दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला 3-0 असे पराभूत केले तर दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानावर येऊ शकतो.

तसेच दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानावर आला तर भारत आणि इंग्लंडचे समान गुण होतील. मात्र इंग्लडचे दशांश गुण अधिक आहे.

ऑस्ट्रेलिया संघालाही पहिल्या स्थानावर येण्याची संधी आहे. मात्र त्यांना भारता विरुद्ध सर्व चारही सामने जिंकावे लागतील आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान कसोटी मालिका बरोबरीत आली तरच ऑस्ट्रेलियाचे पहिले स्थान पक्के आहे.

नुकतीच झालेली भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तीन सामन्यांची टी20 मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली आहे. आता दोन्ही संघ चार सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यास सज्ज आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना 6 डिसेंबरला अॅडिलेडमध्ये खेळला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

धोनीबद्दल विचारताच गांगुलीने पाकिस्तानच्या अध्यक्षांना दिले होते हे गमतीशीर उत्तर

कारकिर्दीच्या शिखरावर असताना मलाही मिताली राज प्रमाणे संघातून वगळले- गांगुली

अखेर स्मृती मंधानाने संघ बदलला, तर हरमनप्रीत कौरचा संघ मात्र कायम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment