रविवारी (३१ जुलै) क्रिकेटप्रेमींना भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील लढत पाहायला मिळाली. कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मधील आपला दुसरा सामना खेळताना भारताने मागील पराभवाचा वचपा काढला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाने पाकिस्तानला ८ विकेट्सने पराभूत करत विजयाचे खाते उघडले. पहिल्या चेंडूपासूनच भारतीय संघाने पाकिस्तानवर दबाव निर्माण करत सोपा विजय मिळवला. यासह भारतीय संघाने त्यांचाच जुना विक्रम मोडित काढला आहे.
या सामन्याच्या (India vs Pakistan) सुरुवातीला पावसाचा व्यत्यय आल्याने १८ षटकांचा खेळ घेण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ निर्धारित १८ षटकात ९९ धावांवरच गुंडाळला गेला. पाकिस्तानच्या नाममात्र १०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीर स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) हिने मॅच विनिंग प्रदर्शन केले. तिने पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेत ताबडतोब डावाखेर नाबाद ६३ धावा फटकावल्या. ४२ चेंडूंचा सामना करताना ३ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ही शानदार खेळी केली. तसेच शेफाली वर्मा (१६ धावा) आणि शब्बीनेनी मेघना (१४ धावा) यांनीही योगदान दिले. परिणामी भारतीय संघाने ११.४ षटकातच सामना जिंकला.
अशाप्रकारे ३८ चेंडू शिल्लक ठेवून सामना जिंकत भारतीय संघाने त्यांचाच जुना विक्रम मोडला (Biggest Win Margin) आहे. यापूर्वी टी२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताने २०१८ मध्ये सर्वात मोठा विजय मिळवला होता. भारताने २३ चेंडू शिल्लक ठेवत पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकला होता. मात्र आता भारतीय संघाने त्यांचाच हा विक्रम मोडला आहे. आता भारतीय संघाने पाकिस्तानवर तब्बल ३८ चेंडू शिल्लक ठेवत सर्वात मोठा विजय नोंदवला आहे.
𝐀𝐋𝐋 𝐎𝐕𝐄𝐑!
Clinical with the ball & splendid with the bat, 𝐈𝐧𝐝𝐢𝐚 𝐛𝐞𝐚𝐭 𝐏𝐚𝐤𝐢𝐬𝐭𝐚𝐧 by 8 wickets in their 2nd Commonwealth Games match. 👏 👏
Vice-captain @mandhana_smriti smashes 63*. 🙌 🙌
Scorecard ▶️ https://t.co/6xtXSkd1O7 #B2022 #TeamIndia #INDvPAK pic.twitter.com/MVUX3yFO4s
— BCCI Women (@BCCIWomen) July 31, 2022
एकूण पाहायचे झाल्यास, कोणत्याही प्रतिस्पर्धांविरुद्ध भारताचा हा चौथा सर्वात मोठा विजय होता. भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय मिळवला आहे. २०१९ मध्ये ग्रॉस आयलेट येथे झालेल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला ५७ चेंडू शिल्लक ठेवून पराभूत केले होते. तर दक्षिण आफ्रिका (५४ चेंडू) आणि बांगलादेशविरुद्ध (४५ चेंडू) भारताला ४० पेक्षा जास्त चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवण्यात यश आले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पराभवाचा बदला घेण्यासाठी विंडीज बदलणार प्लेइंग इलेवन, ‘या’ धाकड खेळाडूची एंट्री निश्चित
टीम इंडिया जिंकतेय तरी ‘या’ चार समस्या वाढवतायेत डोकेदुखी
बॉक्सिंग चॅम्पियन वडिलांना जे जमलं नाही, ते १९ वर्षांच्या लेकाने करून दाखवलं, थेट ‘गोल्ड’ आणले घरी