---Advertisement---

पराभवाचा बदला घेण्यासाठी विंडीज बदलणार प्लेइंग इलेवन, ‘या’ धाकड खेळाडूची एंट्री निश्चित

On: रविवार, जुलै 31, 2022 7:19 PM
West Indies
---Advertisement---

वेस्ट इंडिज संघाची घरच्या मैदानावर निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. आधी बांगलादेशने तर आता भारताने त्यांना पराभवाची चव चाखायला भाग पाडले आहे. यजमान संघाला बांगलादेश आणि भारत यांच्याकडून वनडे मालिका ३-० अशी गमावावी लागली आहे. तर भारताविरुद्धच्या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यातही पराभूत झाला. सलग सात सामने गमावल्याने वेस्ट इंडिज संघाची कुठे चूक झाली तसेच कोणते नवे बदल करण्याची गरज आहे हे पाहुया.

वेस्ट इंडिज विरुद्ध भारत दुसरा टी२० सामना सेंट किट्सच्या वॉर्नर पार्क स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात यजमान संघ विजय मिळवण्याच्या हेतूनेच मैदानात उतरणार आहे. तर निकोलस पूरनच्या नेतृत्वाखाली कोणता अंतिम अकराचा संघ असेल हे पण जाणून घेऊया.

कायले मेयर्स आणि शमराह ब्रुक्स करू शकतात ओपनिंग

पहिल्या सामन्यात कायले मेयर्स आणि शमराह ब्रुक्स यांनी सलामीला फलंदाजी केली होती. ही जोडी खास काही करू शकली नाही. मेयर्स झटपट २० धावा करत बाद झाला. त्याने ज्या षटाकमध्ये फटकेबाजी केली त्याच षटकात आपली विकेटही गमावली. यामुळे संघाला दुसऱ्या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.

अशावेळी मेयर्ससोबत निकोलस पूरन सलामीला येऊ शकतो. तसेच ब्रेंडन किंग हा पण सलामीसाठी एक पर्याय आहे. मात्र तो टी२० प्रकारात विशेष काही करू शकला नाही. तर ब्रूक्सने मागील सामन्यात ६ चेंडूत १५ धावा केल्या होत्या.

मधल्या फळीतील खेळाडूंना सांभाळून करावी लागेल खेळी

वेस्ट इंडिजने मागील सामन्यात मधल्या फळीत एक प्रयोग करून पाहिला होता. त्यांनी जेसन होल्डरला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले होते. मात्र तो शून्यावरच बाद झाला. दुसऱ्या सामन्यात ही चूक टाळावी लागणार आहे. यामुळे पूरन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो.

तसेच होल्डरला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळू शकते. तो मोठे फटके मारण्यात पटाईत आहे. तसेच तो संयमाने खेळतो. यामुळे त्याला चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीची जबाबदारी देण्याची शक्यता आहे.

रोवमन पॉवेल आणि शिमरन हेटमायर फिनिशरच्या भुमिकेत

शिमरन हेटमारचे नुकतेच संघात पुनरागमन झाले आहे. तो फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो. तसेच रोवमन पॉवेल हा देखील धडाकेबाज फलंदाज आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने लवकर विकेट्स गमावले होते. अशातच दुसऱ्या सामन्यात पॉवेल आणि हेटमायर यांना बाकावर बसवणे अयोग्य ठरणार आहे. त्या दोघांना साथ देण्यासाठी ओडियन स्मिथ, अकील होसेन यांनाही अंतिम अकरामध्ये जागा मिळण्याची शक्यता आहे.

किमो पॉलच्या ऐवजी रोमारियो शेफर्ड

वेस्ट इंडिज फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही काही बदल करू शकतो. किमो पॉलच्या ऐवजी रोमारियो शेफर्डला संधी देण्याचा विचार केला जाऊ शकतो. वनडे मालिकेत शेफर्डने उत्तम कामगिरी केली आहे. त्याने जवळपास संघाल सामना जिंकूनच दिला होता. तर किमो पॉलने २ षटाकत २४ धावा दिल्या आणि फलंदाजीतही अपयशी ठरला. त्याचबरोबर जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, स्मिथ, ओबेड मॅकॉय आणि होसेन हे पण गोलंदाजीचे पर्याय आहेत.

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी२०साठी वेस्ट इंडिजची संभाव्य प्लेइंग इलेवन-

कायले मेयर्स, शमराह ब्रुक्स, निकोलस पूरन (कर्णधार), जेसन होल्डर, रोवमन पॉवेल, शिमरन हेटमायर, अकील होसेन, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ, ओबेड मॅकॉय.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

भारताने पाकिस्तानविरुद्ध उघडले विजयाचे खाते, स्म्रीतीच्या धुव्वादार अर्धशतकाने सामना खिशात

शमीच्या पत्नीच्या व्हायरल व्हिडिओमुळे चाहत्यांना आठवला जुना वाद; म्हणतीये, ‘ये प्यार-व्यार नही होता मुझसे…’

रविंद्र जडेजामुळे ‘या’ खेळाडूची कारकीर्द संपण्याच्या मार्गावर, धोनीसारखा आहे फिनिशर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---