भारतीय क्रिकेट संघ ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरा कसोटी सामना खेळत आहे. या कसोटी सामन्याच्या मध्यावर एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये तीन मोठ्या खेळाडूंना संघातून मुक्त करण्यात आले आहे. संघातून सोडण्यात आलेले तिन्ही खेळाडू वेगवान गोलंदाज आहेत. आता त्यांना विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी भारतात परत पाठवले जात आहे. यापैकी एकाही खेळाडूचा मुख्य भारतीय संघात समावेश नव्हता. ते केवळ बॅकअप म्हणून ऑस्ट्रेलियात संघासोबत होते.
बीसीसीआयने मुकेश कुमार, नवदीप सैनी आणि यश दयाल यांना संघातून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 21 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये हे तीन वेगवान गोलंदाज खेळताना दिसणार आहेत. यापैकी मुकेश आणि नवदीप नोव्हेंबरमध्येच भारत अ संघासोबत ऑस्ट्रेलियाला गेले होते. ज्यात त्यांनी ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध दोन चार दिवसीय सामने खेळले होते.
अ संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या काही खेळाडूंना वरिष्ठ संघाशी जोडण्यात आले आणि बाकी सर्व खेळाडूंना भारतात परत पाठवण्यात आले. दयाल भारताच्या अ संघाचा भाग नव्हता, परंतु दक्षिण आफ्रिकेतील टी20 मालिका संपल्यानंतर लगेचच त्याला ऑस्ट्रेलियात बोलावण्यात आले होते.
Yash Dayal, Mukesh Kumar, Navdeep Saini have been released from the BGT squad to play in the Vijay Hazare Trophy. [Sahil Malhotra from TOI] pic.twitter.com/yUNEtiastU
— Johns. (@CricCrazyJohns) December 15, 2024
भारत अ संघासाठी मुकेश कुमारची कामगिरी उत्कृष्ट होती. तो भारतीय कसोटी संघात पुनरागमन करेल अशी आशा होती पण तसे झाले नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया अ संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या मालिकेत मुकेशने दोन सामन्यांत 11 बळींसह सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता.
2023 मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर कसोटी पदार्पण करणाऱ्या मुकेशने आतापर्यंत भारतासाठी केवळ तीन कसोटी सामने खेळले आहेत. या तीन सामन्यांमध्ये त्याने 7 विकेट्स घेतल्या. मुकेशने या वर्षाच्या सुरुवातीला हैदराबादमध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
हेही वाचा-
शतकासह ट्रॅव्हिस हेडचा गाबामध्ये मोठा विक्रम, अशी कामगिरी करणारा इतिहासातील पहिलाच खेळाडू!
‘वन मॅन आर्मी’..! बुम-बुमचा पुन्हा एकदा पंजा, गाबा कसोटीत जसप्रीत बुमराहची ऐतिहासिक कामगिरी
स्टीव्ह स्मिथचा कमबॅक, तब्बल इतक्या दिवसांनंतर ठोकलं कसोटी शतक!