भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी (06 सप्टेंबर) श्रीलंकेविरुद्धचा आशिया चषक 2022 मधील आपला दुसरा सामना 6 विकेट्सने गमावला. हा सामना भारतासाठी करा अथवा मरा परिस्थितीचा सामना होता. परंतु या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 173 धावाच करू शकला. प्रत्युत्तरात श्रीलंका संघाने 1 चेंडू शिल्लक असताना सामना खिशात घातला. या पराभवासह भारताचे आशिया चषकातील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.
तरीही भारतीय संघापुढे आणखी एक शेवटचा अपेक्षेचा किरण आहे. भारतीय संघाला (Team India) अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठीची गणिते कशी (Team India Equations) आहेत?, याचा आढावा घेऊ…
भारताची सुपर-4 फेरीत दुर्दशा
साखळी फेरीतील सलग 2 सामने जिंकत भारतीय संघाने सुपर-4 फेरीत प्रवेश केला होता. परंतु सुपर- 4 फेरीत भारतीय संघाला अपेक्षित प्रदर्शन करता आले नाही. त्यांनी पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना 1 चेंडू शिल्लक असताना 5 विकेट्सने जिंकला. या पराभवानंतर भारतीय संघाला पुढील सामन्यात श्रीलंकेला पराभूत करणे अत्यंत आवश्यक होते. कारण भारताने जर श्रीलंकेला हरवले असते, तर त्यांच्या खात्यात 2 गुण जमा झाले आहे. ज्यानंतर भारतापुढे फक्त अफगाणिस्तानला पराभूत करण्याचे आवाहन राहिले असते. परंतु श्रीलंकेविरुद्धच्या ‘करा वा मरा’ सामन्यातही भारताला 6 विकेट्सने पराभव पाहावा लागला.
कशी आहेत अंतिम सामन्यात पोहोचण्याची समीकरणे?
यानंतर आता भारतीय संघाला अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी इतर संघांवर अवलंबून राहावे लागेल. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघात 7 सप्टेंबरला शारजाहमध्ये चौथा सुपर-4 सामना रंगणार आहे. या सामन्यात जर अफगाणिस्तान संघाने विजय मिळवला, तर भारताच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याच्या आशा पल्लवित होतील. त्यानंतर 8 सप्टेंबरला दुबईत अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात भारताला काहीही करून विजय मिळवावा लागेल.
यानंतरही भारतीय संघाला शेवटच्या सुपर-4 सामन्यातील निकालावर निर्भर राहावे लागेल. श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान संघात 9 सप्टेंबरला दुबईत शेवटचा सुपर-4 सामना रंगणार आहे. जर श्रीलंकेने या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केले, तर भारतीय संघ नेट रन रेटच्या जोरावर अंतिम सामन्यात पोहोचू शकतो. श्रीलंकेचा संघ आधीच अंतिम सामन्यात पोहोचला आहे.
वरील तिन्ही निकालांनंतर भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघांच्या खात्यात प्रत्येकी 2 गुण असतील. त्यामुळे नेट रन रेटवर अंतिम सामन्यात पोहोचणारा दुसरा संघ ठरेल. आशिया चषकाचा अंतिम सामना 11 सप्टेंबरला दुबईत होणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारत आता अफगाणिस्तान भरोसे, नबी अन् संघाला पाकिस्तानविरुद्ध करावं लागेल ‘हे’ काम
कर्णधार रोहितच्या ‘या’ निर्णयामुळे हारली इंडिया! पाकिस्तानचा घाम फोडणाऱ्या गोलंदाजालाच केले बाहेर
रोहितच्या वादळी खेळीनंतर श्रीलंकेचा कमबॅक! टीम इंडिया 8 बाद 173