---Advertisement---

टीम इंडियाच्या या प्रशिक्षकाने सोडली संघाची साथ! आता आयपीएल संघात दिसणार नवीन भूमिकेत

On: मंगळवार, जुलै 28, 2026 6:57 PM
---Advertisement---

टीम इंडियाचा (Team india) जिम्बाब्वे दौरा संपला असून, आता ऑगस्टमध्ये टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार असून, यासाठी बीसीसीआयने (BCCI) संघ जाहीर केला आहे. यादरम्यान भारतीय संघाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.

संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रयान टेन डोशेट (Ryan Ten Doeschate) यांनी संघाची साथ सोडली आहे. ते पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये (IPL) केकेआर (KKR) संघासोबत दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रयान टेन डोशेट बऱ्याच काळापासून टीम इंडियासोबत सहाय्यक प्रशिक्षक (Assistant Coach) म्हणून जोडले गेले होते. भारतीय संघ जेव्हा इंग्लंडच्या दौऱ्यावर होता, तेव्हाच त्यांनी जिम्बाब्वे मालिकेनंतर आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते.

दरम्यान, एका रिपोर्टनुसार, डोशेट आता केकेआरच्या कोचिंग स्टाफमध्ये सामील होणार असून पुढील वर्षी संघासोबत दिसतील. रयान टेन डोशेट हे 2024 मध्ये टीम इंडियासोबत जोडले गेले होते. ते नेदरलँड्स क्रिकेट संघाचे कर्णधारही राहिले आहेत. राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपल्यानंतर जेव्हा टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बदलले, त्याच वेळी रयान टेन डोशेट देखील संघासोबत आले होते. भारतीय संघाची फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सुधारणे हे डोशेट यांचे काम होते, ज्यामध्ये ते बऱ्याच अंशी यशस्वीही ठरले.

कोलकाता नाइट रायडर्स (KKR) बद्दल बोलायचे तर, ते यापूर्वीही या फ्रँचायझीशी जोडले गेले होते. केकेआरने 2012 आणि 2014 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले, तेव्हा ते संघात खेळाडू म्हणून खेळत होते. त्यानंतर 2022 मध्ये ते संघाचे क्षेत्ररक्षण (Fielding) प्रशिक्षक बनले आणि 2024 पर्यंत त्यांनी ही भूमिका पार पाडली.

दरम्यान, रयान टेन डोशेट यांच्या कार्यकाळात भारताने 2025 मध्ये आशिया कपचे विजेतेपद जिंकले. यानंतर 2026 चा आयसीसी टी-20 विश्वचषक जिंकण्यातही भारताला यश मिळाले. मात्र, या काळात कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---