---Advertisement---

एकेवेळी केली टीम इंडियाची सेवा, आता सामन्याचे पासही मिळणे अवघड

On: सोमवार, मे 4, 2020 12:22 PM
---Advertisement---

क्रिकेटचे अनेक वेडे चाहते आपण पाहिले आहे. क्रिकेटपटूंचे तर खास फॅन्स असतात, जे आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंसाठी मैदानात जात असतात. सचिन तेंडूलकर, विराट कोहली किंवा एमएस धोनी यांचे चाहते तर अंगावर पेटिंग करुन त्यांच्या सामन्याला हजेरी लावतात.

परंतु संघाचे असे फॅन फारच कमी वेळा मैदानावर दिसतात. कर्नाटक रणजी संघाचा असाच एक फॅन  त्या संघाच्या सर्व सामन्यांना हजेरी लावतो. तसाच टीम इंडियाचाही एक खास फॅन आहे. त्याचे नाव धरमवीर पाल.

भारतीय संघाचा बॉल बॉय म्हणून जबाबदारी पार पडणारा धरमवीर हा एक मोठा क्रिकेट चाहता आहे.  त्याचा जन्म मध्यप्रदेशमधील मोनेर जिल्ह्यात झाला आहे. तो भारतीय संघाचे सामने पाहायला जगभर फिरला आहे. 

त्याचा हा प्रवास १२ वर्षांपूर्वी २००५ साली भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात मोहाली येथे झालेल्या वनडेने सुरु झाला होता.  अपंगांसाठी आयोजित स्पर्धेत त्याने मध्यप्रदेश संघाचे नेतृत्व केले होते.

परंतु ऑक्टोबर २०१७पासून  त्याला कोणत्याही सामन्याला बाॅल बाॅय म्हणून हजेरी लावता आलेली नाही.

बीसीसीआयच्या २०१७मधील नवीन नियमांप्रमाणे तो असं करताना दिसत  नाही.  २०१७मध्ये जेव्हा धरमवीर भारत विरुद्ध न्यूजीलँड सामन्यावेळी मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर आला तेव्हा त्याला बॉल बॉय’चा पास नाकारण्यात आला होता. त्याला भारतीय संघातील एका खेळाडूने तिकिट दिल्यामुळे तो सामना पाहू शकला होता.

२६ वर्षीय धरमवीर पोलिओमुळे लहानपणापासून अपंग आहे. तो टीम इंडिया ज्या शहरात सामना खेळणार आहे त्या प्रत्येक शहरात बॉल बॉय म्हणून उपस्थित असायचा.

धरमवीर तेव्हा म्हणला होता की, मला क्रिकेट पहाण्याशी घेणदेण आहे. मग ते सीमारेषेवरुन असो किंवा स्टेडियमच्या स्टॅंडमधून.

महत्त्वाचे लेख-

७ असे खेळाडू ज्यांच्याबरोबर रोहित खेळला आहे क्रिकेट, पण नाव कुणालाही नाही आठवत

ड्रीम ११: फक्त कन्यारत्नं असलेल्या भारतीय क्रिकेटपटूंची ड्रीम टीम इंडिया

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळालेले महाराष्ट्रीयन खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment