---Advertisement---

१ मार्च ठरणार टीम इंडियाच्या सदस्यांसह चाहत्यांसाठी सर्वात खास दिवस

On: बुधवार, फेब्रुवारी 27, 2019 7:27 PM
---Advertisement---

आयसीसी विश्वचषक स्पर्धा सुरु होण्यासाठी आता 100 दिवसांपेक्षाही कमी दिवस राहिले आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढत आहे.

त्यातच मागील विश्वचषकाप्रमाणेच यावेळीही भारतीय संघ विश्वचषकात नवीन जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. या नवीन वनडे जर्सीचे अनावरण नाइके 1 मार्चला हैद्राबाद येथे करणार आहे.

त्यामुळे 2 मार्चपासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेत भारतीय संघ पहिल्यांदा ही नवीन जर्सी घालून खेळणार आहे.

याबद्दल क्रिकेट पत्रकार चेतन नेरुला यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘हे विश्वचषकाचे वर्ष आहे. भारतीय संघाच्या नवीन वनडे जर्सीचे 1 मार्चला हैद्राबाद येथे अनावरण होणार आहे.’

भारतीय संघाची ऑस्ट्रेलिया विरुद्धची वनडे मालिका ही विश्वचषकाआधीची शेवटची वनडे मालिका आहे. त्यामुळे भारतासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. या मालिकेनंतर आयपीएल सुरु होणार आहे.

आयपीएलनंतर 30 मे पासून विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. भारताचा विश्वचषकातील पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित शर्माला विश्रांती, दुसऱ्या टी२०साठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया

एमएस धोनी खेळतोय आंतरराष्ट्रीय टी२०चा शेवटचा सामना?

धोनी-कोहलीमधील ती खास शर्यत नक्की जिंकणार कोण?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment