भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला आजपासून (22 जानेवारी) सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांमधील पहिला टी20 सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. या सामन्यासाठी इंग्लंडने सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच काल त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. तर या सामन्यात भारताचा प्लेइंग इलेव्हन कसा असू शकतो, यावर नजर टाकूयात.
या खेळाडूंना संधी मिळणे कठीण
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात युवा खेळाडू नितीश कुमार रेड्डीला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे खूप कठीण आहे. तर हर्षित राणाला देखील टी20 आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यासाठी आणखी वाट पहावी लागण्याची शक्यता आहे. तर कोलकात्याच्या फिरकी खेळपट्टीवर वॉशिंग्टन सुंदरची निवड होते का हे पाहणे रंजक राहणार आहे. कारण उपकर्णधार म्हणून अक्षर पटेल संघात आहे.
पहिल्या टी20 मध्ये सलामीबद्दल बोलायचे झाले तर, यष्टिरक्षक संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा डावाची सुरुवात करू शकतात. यानंतर, तिलक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर आणि कर्णधार सूर्या चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो. यानंतर, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल हे मॅच फिनिशरच्या भूमिकेत दिसू शकतात.
कोलकात्याच्या खेळपट्टीचा विचार करता, भारत या सामन्यात तीन फिरकी गोलंदाजांसह उतरू शकतो. यामध्ये अक्षर पटेल, रवी बिश्नोई आणि मिस्ट्री फिरकीपटू वरुण चक्रवर्ती हे अॅक्शनमध्ये दिसू शकतात. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमी यांच्या खांद्यावर असू शकते. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्याचा वापर तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून केला जाईल.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यासाठी भारताचा संभाव्य खेळाडू – संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग.
भारताविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यासाठी इंग्लंडचा संघ – फिल साल्ट (यष्टीरक्षक), बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड आणि गस अॅटकिन्सन
हेही वाचा-
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ‘जर्सी वादाला’ नवे वळण, BCCIच्या कृतीवर ICCची मोठी प्रतिक्रिया
IIT बाबामुळे भारताने जिंकला 2024चा टी20 विश्वचषक? महाकुंभ मेळाव्यात स्वत:च केला खळबळजनक दावा! VIDEO
चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी निवड न झाल्याने सूर्यकुमार यादवने व्यक्त केले दु:ख! म्हणाला…