---Advertisement---

हेडिंग्लेवर विजयाची हॅट्रिक पूर्ण करण्याची टीम इंडियाला संधी, पाहा कसा आहे आत्तापर्यंतचा रेकॉर्ड

On: बुधवार, ऑगस्ट 25, 2021 11:00 AM
---Advertisement---

लॉर्ड्स कसोटीतील रोमहर्षक विजयानंतर भारतीय क्रिकेट संघ उत्साहात आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ यजमान इंग्लंडविरुद्ध २५ ऑगस्टपासून हेडिंग्ले (लीड्स) येथे मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळेल. भारतीय संघाला १९ वर्षानंतर या मैदानावर विजय मिळवण्याची संधी असेल. लॉर्ड्सनंतर लीड्सवर देखील विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.

अशी राहिली आहे लीड्सवरील कामगिरी
भारतीय संघाने हेडिंग्ले येथील लीड्स मैदानावर आत्तापर्यंत ६ कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन सामन्यात भारतीय संघाला विजय मिळाला आहे. एक सामना अनिर्णित तर तीन सामने भारतीय संघ या मैदानावर हरला आहे. १९८६ व २००२ दौऱ्यावेळी भारतीय संघाने या मैदानावर विजय संपादन केलेला. २००२ दौऱ्यावेळी सौरव गांगुलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने यजमानांना एक डाव व ४६ धावांनी पराभूत केलेले.

इंग्लंडने अखेरच्या सामन्यात मिळवला विजय
इंग्लंड संघाने या मैदानावर आपला अखेरचा कसोटी सामना २०१९ ऍशेसवेळी खेळला होता. या सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या ६७ धावांवर संपुष्टात आला होता. मात्र, दुसऱ्या डावात अष्टपैलू बेन स्टोक्सने एक ऐतिहासिक शतकी खेळी करत संघाला एक गडी राखून विजय मिळवून दिला होता.

भारतीय संघाला आघाडी घेण्याची संधी
पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. लीड्स कसोटी जिंकून भारतीय संघ मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. विशेष म्हणजे सध्याच्या भारतीय संघातील सर्व खेळाडू प्रथमच या मैदानावर खेळतील.

लीड्स कसोटीसाठी संभावित भारतीय संघ-
रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी व जसप्रीत बुमराह.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘माही मार रहा है’! सरावादरम्यान धोनीने मारले एक से बढकर एक षटकार; पाहा व्हिडिओ

चॅलेंजर्स रेडी फॉर चॅलेंज! आरसीबीचा संघ ‘या’ दिवशी भरणार यूएईसाठी उड्डाण

नव्या भूमिकेसाठी इरफान सज्ज; ‘तो’ अभ्यासक्रम पूर्ण करताच आयपीएलमध्ये प्रशिक्षक बनण्याची इच्छा व्यक्त

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---