---Advertisement---

भारत ऐतिहासिक १०००वा वनडे खेळण्यास सज्ज, पण यापूर्वीच्या ९९९ सामन्यांमध्ये कशी राहिलीय कामगिरी? वाचा

On: शनिवार, फेब्रुवारी 5, 2022 5:42 PM
ind team
---Advertisement---

वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर (West Indies Tour Of India) आला असून उभय संघांमध्ये रविवारपासून (०६ फेब्रुवारी) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ३ सामन्यांची वनडे मालिका (3 Matches ODI Series) खेळली जाणार आहे. रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) याच्यासाठी ही मालिका अत्यंत खास असणार आहे. भारताच्या वनडे संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून ही त्याची पहिलीच मालिका असेल. तसेच या मालिकेतील पहिला वनडे सामनाही त्याच्यासाठी आणि संपूर्ण भारतीय संघासाठी अतिशय विशेष असणार आहे. कारण हा सामना भारतीय संघाचा १००० वा वनडे सामना (1000th ODI) असेल. त्यामुळे यासह भारतीय संघ १००० वनडे सामने खेळणारा जगातील पहिलाच संघ बनेल. 

लवकरच या ऐतिहासिक सामन्याचा भाग होणाऱ्या भारतीय संघाने आतापर्यंत ९९९ वनडे सामने खेळले आहेत. यापैकी ५१८ सामन्यात संघाने विजयाची चव चाखली आहे तर ४३१ सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. तसेच उर्वरित ४१ सामने अनिर्णीत राहिले आहेत आणि ९ सामने बरोबरीत सुटले आहेत.

विशेष म्हणजे, भारतीय संघ हा सर्वाधिक वनडे सामने खेळणाऱ्या संघाच्या यादीत अव्वलस्थानी आहे. त्यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या क्रमांकावर येतो. त्यांनी आतापर्यंत ९५८ वनडे सामने खेळले आहेत. तर भारताचा शेजारी देश अर्थातच पाकिस्तानच्या संघाने ९३६ सामने खेळले आहेत. तसेच श्रीलंकेचा संघ (८७० सामने) आणि वेस्ट इंडिजचा (८३४ सामने) संघही टॉप-५ मध्ये आहे.

सर्वाधिक वनडे सामने खेळणारे संघ
भारत- ९९९
ऑस्ट्रेलिया- ९५८
पाकिस्तान- ९३६
श्रीलंका- ८७०
वेस्ट इंडिज- ८३४

याखेरीज भारतीय संघाला आतापर्यंतच्या ९ शतकी सामन्यांमध्ये केवळ ४ वेळा विजय मिळवता आला आहे. ४०० व्या, ६०० व्या, ७०० व्या आणि ९०० व्या वनडे सामन्यात भारतीय संघाने विजयाची नोंद केली आहे. तर उर्वरित शतकी सामने गमावले आहेत. त्यामुळे आता १००० व्या ऐतिहासिक सामन्यात भारतीय संघाच्या नशिबी विजय येईल की पराजय, यावर सर्वांचीच नजर असेल.

शतकी सामन्यांतील भारतीय संघाचे निकाल (वनडे)
१०० व्या वनडेत, पराभव (१९८६)
२०० व्या वनडेत, पराभव (१९९२)
३०० व्या वनडेत, पराभव (१९९६)
४०० व्या वनडेत, विजय (१९९९)
५०० व्या वनडेत, अनिर्णीत (२००२)
६०० व्या वनडेत, विजय (२००५)
७०० व्या वनडेत, विजय (२००८)
८०० व्या वनडेत, पराभव (२०१२)
९०० व्या वनडेत, विजय (२०१६)
१००० व्या वनडेत, ??? (२०२२)

महत्त्वाच्या बातम्या-

खाकीच्या भीतीने ‘त्याची’ अशी काही टरकली की, पठ्ठ्याने भारतात येण्याचेच बंद केलं

भर मैदानात क्रिकेटरने सिगारेट फुंकण्याची केली हिम्मत, मग काय होत्याचं नव्हतं होऊन बसलं

व्हीलचेअरवर आलेल्या ख्रिस केर्न्सच्या आयुष्यात आणखी एक वादळ; कॅन्सरचे झाले निदान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---