क्रिकेटला सज्जनांचा खेळ म्हटले जाते. परंतु बऱ्याचदा मैदानावर अशा काही घटना घडतात, ज्यामुळे क्रिकेटचे नाव खराब होते. स्पॉट फिक्सिंग, सट्टेबाजी, प्रतिस्पर्धी किंवा आपापसांत खेळाडूंचे होणारे वाद, इत्यादी घटनांमुळे क्रिकेटच्या प्रतिमेला धक्का पोहोचतो. शुक्रवारी (०५ फेब्रुवारी) बांगलादेश प्रीमियर लीग (Bangladesh Premier League) मध्येही असेच काहीसे घडले आहे. या दिवशी अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद शहजाद (Mohammad Shahzad) भर मैदानात सिगारेट फुंकताना (Mohammad Shahzad Smoking In Ground) दिसला आहे.
त्याचे झाले असे की, शुक्रवारी बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये वेळापत्रकानुसार मिनिस्टर ग्रुप ढाका विरुद्ध कोमिला व्हिक्टोरियन यांच्यात सामना होणार होता. परंतु पावसामुळे हा सामना सुरू होण्यास उशीर झाला. त्यामुळे उभय संघांचे खेळाडू शेर ए बांगला नॅशनल स्टेडियमवर थांबून सामना सुरू होण्याची वाट पाहात होता. यांमध्ये शहजादचाही समावेश होता. तोही इतर खेळाडूंसमवेत मैदानावर थांबला होता.
हेही वाचा- कसोटी कर्णधारपदी आपली वर्णी लागणं रोहितला वाटतंय अशक्य; म्हणे, ‘सध्यातरी त्याबद्दल विसरून जा’
मात्र यावेळी तो आपल्या हातात सिगारेट घेऊन मैदानावर सिगारेट ओढत (Smoking In Ground) रिकामा वेळ घालवताना दिसला. क्रिकेटचे नियम आणि आपल्यावरील कॅमेरांचे फोकस, या सर्वांपासून गाफील असलेला हा खेळाडू बराच वेळ मैदानावर थांबून सिगारेट फुंकताना दिसला. त्याचे असे कृत्य करतानाचे बरेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Afghan batter Mohammad Shahzad was reprimanded for smoking on the field during a rain delay in yesterday's #BPL2022 double header. pic.twitter.com/8bQM7Lf5B8
— ????Flashscore Cricket (@FlashCric) February 5, 2022
Mohammad Shahzad was reprimanded for smoking on the ground in the BPL yesterday. pic.twitter.com/fZoPdnPKh5
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 5, 2022
बांगलादेशच्या मीडिया संस्थांनी शहजादचा मैदानात स्मोकिंग करताना फोटो वृत्तपत्रात छापला आहे. यावर खूप सारे अहवालही पुढे आले आहेत. एका अहावालात तर असेही म्हटले गेले आहे की, ढाका संघाचे प्रशिक्षक मिजानुर रेहमान यांनी शहजाहदा असे न करण्याची चेतावणी दिली होती. त्यानंतर तमीम इकबालने शहजादचा ड्रेसिंग रूममध्ये परतण्यासाठी सांगितले होते.
OFFICIAL: Mohammad Shahzad has been handed one demerit point for smoking (e-cigarette) on the field tonight. BCB also gave a warning to him. #BCB #BPL2022 pic.twitter.com/Vn6vpZjw5D
— Saif Ahmed (@saifahmed75) February 4, 2022
तसेच, शहजादला त्याच्या या कृतीसाठी शिक्षाही भोगावी लागली आहे. भर मैदानात थांबून सिगारेट ओढताना दिसल्यामुळे सामना अधिकाऱ्यांनी शहजादला फटकारले आहे. त्याची ही कृती खेळ भावनेच्या विरोधात होती. त्यामुळे त्याच्या शिस्तीच्या खात्यात एक अवगुण (डिमेरिट गुण) जोडण्यात आला आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने या घटनेवर अधिकृत वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, शहजादने त्याचा गुन्हा स्विकार केला आहे आणि सामना रेफरी नीयामुर राशिदद्वारा प्रस्तावित शिक्षेचाही स्विकार केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी अधिकृत सुनावणीची आवश्यकता नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी कर्णधारपदी आपली वर्णी लागणं रोहितला वाटतंय अशक्य; म्हणे, ‘सध्यातरी त्याबद्दल विसरून जा’
‘….आणि माही कॅप्टन बनला!’ धोनीच्या कर्णधार बनण्याची इनसाईड स्टोरी
‘गांगुलीला खेळायचा होता टी२० वर्ल्डकप पण द्रविडने…’ १५ वर्षांनी झाला गौप्यस्फोट






