---Advertisement---

विराट कोहलीची टीम इंडियाशी सिक्रेट भेट, घरी बोलावून कर्णधार व उपकर्णधाराला दिल्या विजयाच्या टिप्स!

---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेची सुरुवात 3 दिवसानंतर होणार आहे. याआधी सर्व भारतीय खेळाडू हेडिंग्ले कसोटी सामन्याची तयारी करत आहेत. यामध्येच मोठी माहिती समोर येत आहे, टीम इंडियाचे (Team india) काही खेळाडू यांच्यासोबत किंग कोहलीची सीक्रेट भेट झाली आहे. जिथे रन मशीन विराट कोहलीने (Virat Kohli) कर्णधार आणि उपकर्णधार यांच्यासहित काही भारतीय खेळाडूंना त्याच्या लंडनमधल्या घरी बोलवले होते.

रेवस्पोटच्या रिपोर्टनुसार मागच्या महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या विराट कोहलीने त्याच्या लंडनमधील घरी काही भारतीय खेळाडूंना बोलावले होते. ज्यामध्ये कर्णधार शुभमन गिल (Shubman gill), रिषभ पंत (Rishbh Pant) वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohmmad Siraj) सोबत अनेक भारतीय खेळाडू सामील होते. फलंदाज म्हणून विराटने इंग्लंडमध्ये अपयश आणि यश दोन्ही पाहिले आहे. अशा परिस्थितीत भारतीय खेळाडूंना त्याने काही सल्ले दिले आहेत. कर्णधार म्हणून देखील विराटचं इंग्लंडमध्ये रेकॉर्ड चांगलं राहिलेलं आहे, अशा परिस्थितीत गिल आणि रिषभ यांना या भेटीदरम्यान काही चांगले सल्ले विराटकडून मिळाले असतील.

इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर टीम इंडियाने (Team india) 2007 मध्ये पराभूत केले होते. त्यावेळी भारतीय संघाचे कर्णधार राहुल द्रविड (Rahul Dravid) होते. आता कर्णधार म्हणून गिलकडे 18 वर्षानंतर इतिहास रचण्याची शानदार संधी आहे. जे कर्णधार म्हणून विराट कोहली (Virat Kohli) आणि महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) सुद्धा करू शकले नाहीत, ते करण्याचा गिलचा प्रयत्न असेल. सध्या फलंदाज आणि कर्णधार म्हणून गिलवर मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत, ही मालिका जिंकून टीकाकारांना सडेतोड उत्तर देण्याचा गिलचा प्रयत्न असेल.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---