भारतीय संघाचा स्टार विकेटकीपर-फलंदाज केएल राहुल आयपीएल 2025 च्या सुरुवातीच्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. फ्रँचायझीने आगामी हंगामासाठी अद्याप आपला कर्णधार जाहीर केलेला नाही. इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूकनेही रविवारी त्याचा आयपीएल करार संपवला आहे.
केएल राहुल चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळताना दिसला होता. तो पूर्णपणे फिट आहे. तरीदेखील तो आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात का खेळणार नाहीये?. त्याची पत्नी अथिया लवकरच गोड बातमी देणार आहे. राहुल लवकरच बाबा होणार आहे. अशा प्रकारे राहुलला आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. यामुळे तो आयपीएल 2025 चे दोन किंवा तीन सामने खेळू शकत नाही.
दिल्ली कॅपिटल्सने अद्याप आयपीएल 2025 साठी त्यांचा नवीन कर्णधार जाहीर केलेला नाही. फ्रँचायझीने लिलावात केएल राहुलला 14 कोटी रुपयांना विकत घेतले. या प्रकरणात दिल्ली संघाची कमान राहुलकडे सोपवू शकते अशी आशा आहे. अक्षर पटेल त्याच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करू शकतो.
हॅरी ब्रुकने आयपीएल 2025 मधून आपले नाव मागे घेतले आहे. इंग्लंडच्या या युवा फलंदाजाने रविवारी (9 मार्च) आपला निर्णय जाहीर केला. ब्रुक आयपीएल 2024 मध्येही खेळला नव्हता. तरीही तो दिल्ली संघाचा भाग होता, परंतु हंगाम सुरू होण्यापूर्वी त्याने स्पर्धेतून माघार घेतली. आयपीएल 2025 च्या लिलावात हॅरी ब्रुकला दिल्ली कॅपिटल्सने 6.25 कोटी रुपयांना खरेदी केले.
आयपीएल 2025 मार्च 22 पासून सुरू होईल. 18 व्या हंगामातील पहिला सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होईल. दिल्ली कॅपिटल्स 24 मार्च रोजी लीगमधील आपला पहिला सामना खेळेल.
महत्वाच्या बातम्या :
‘विजयाचा जल्लोष, पण मनात खदखद… ‘, श्रेयस अय्यरची नाराजी समोर
रिषभ पंतने केला मोठा खुलासा, शॉट मारताना का सुटतो एका हातातून बॅट?
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर थरारक सामना, या संघाशी भिडणार टीम इंडिया