नाशिक | रविवारी (दि.२९) घेण्यात आलेल्या जसपाल मेमोरियल चॅम्पियनशिप स्पर्धेत एकूण १३३ स्पर्धकांनी सहभाग घेत नाशिककरांनी भरघोस सहभाग नोंदवला. टाईम ट्रायल हा सायकलिंग स्पर्धा प्रकार नाशिककर सायकलपटूना तसा नवीन असूनही जसपालवर विशेष प्रेम असलेल्या सायकलपटूनी स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत सर्व वयोगटात मुंबईचे सात, पुणे एक आणि नाशिकचे १७ असे एकूण २५ सायकलपटू विजेते ठरले.
आदिवासी भाग तसेच शहरातून प्रतिभावान आणि होतकरू खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्पर्धांत संधी मिळावी या हेतूने प्रयत्न करणाऱ्या नाशिक सायक्लीस्ट्सचे दिवंगत अध्यक्ष जसपाल सिंग विर्दी यांच्या स्वप्नपूर्तीसाठी टीम जसपालतर्फे आयोजित पहिल्या वहिल्या जसपाल मेमोरियल चॅम्पियनशिप स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत दहा गटांत एकूण १३३ सायकलपटूनी सहभाग नोंदवला. विजेत्यांना जसपालसिंग यांचे आजोबा गुरुदेवसिंग विर्दी, नाशिक शहराचे पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, एनसीएफचे मार्गदर्शक हरीशजी बैजल यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी नाशिक सायक्लीस्ट्सचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया, एनडीसीएचे सचिव नितीन नागरे उपस्थित होते.
१३ वर्षाखालील मुलींच्या गटात ऋतू भामरे हिने पहिला, सुजाता वाघेरे हिने दुसरा तर मुंबईच्या साक्षी धबालीयाने तिसरा क्रमांक पटकावला आहे. ९ किमीच्या टाइम ट्रायल प्रकारात घेण्यात आलेली ही रेस तिघींनी अनुक्रमे १७ मिनिट ३४ सेकंद, १७ मिनिट ४६ सेकंद आणि २३ मिनिट ६ सेकंदात पूर्ण केली. १३ वर्षाखालील मुलांच्या गटात मल्हार नवले (वेळ १५:४९), मुंबईकर शौर्य मकवाना (१६:०९), रेहान हकीमी (१८:०८) यांनी अनुक्रमाने पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. १३ ते १६ वयोगटात मुलींमध्ये संध्या कोकाटे पहिल्या (१६:०४), प्रिया धबालीया दुसऱ्या (१६:०६) तर वैष्णवी पिल्लई (१६:२३) तिसऱ्या क्रमांकावर राहिली. तर मुलांच्या गटात ओम महाजन (१२:३०) पहिला, निसर्ग भामरे दुसरा (१३:००) तर जतीन जोशी (१३:३२) तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
महिलांचा १६ ते २० आणि २० ते ४० वयोगट एकत्र करण्यात येऊन ३० किमीचे अंतर प्रांजल पाटोळे हिने १ तास १ मिनिट १४ सेकंदात पूर्ण करत पहिल्या क्रमांकावर राहिली तर अनुजा उगले (०१:०२:३१) दुसऱ्या क्रमांकावर राहिली. मुलांच्या १६ ते २० वयोगटात पुण्याच्या विवेक वाईकर (२६:५९), मुंबईचा निर्मित शाह (२९:२९), नाशिककर ऱ्हिदम देव (३०:२१) यांनी १५ किमीचे अंतर पूर्ण करत अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला.
२० ते ४० वयोगट पुरुष गटात २७ किमीचे रेस घेण्यात आली. यात सोनू गुप्ता (४५:४०), दर्शन दुबे (५०:१८), राकेश पावरा (५०:३३) यांनी बक्षिसे जिंकली. तर वेटरन गटात २७ किमीचे अंतर महिलांत नंदा गायकवाड (०१:१३:१४), मनीषा रौंदळ (०१:१४:०२) यांनी पूर्ण केले. परुषांत माणिक निकम (५२:१५), महेंद्र महाजन (५२:४१) आणि दिनकर पाटील (५३:१६) यांनी पहिल्या तिघांत स्थान मिळवले.
या स्पर्धेच्या विजेत्यांसाठी भरघोस बक्षिसांची लयलूट करण्यात आली. प्रत्येक गटाच्या पहिल्या क्रमांकासाठी रुपये तीन हजार (शिवशक्ती सायकल्स), तर दुसऱ्या क्रमांकासाठी रुपये दोन हजार (लुथरा एजन्सीज) तिसऱ्या क्रमांकासाठी एक हजार अशी बक्षिसे वितरित करण्यात आली.
ग्रेप काँटी, ओरोबोरस सायकल्स, नाशिक सायक्लीस्ट्स फाउंडेशन, नाशिक जिल्हा सायकलिंग असोसिएशन यांचे स्पर्धेसाठी सहकार्य लाभले. तर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी रॅम फिनिशर डॉ. महेंद्र महाजन, मिलिंद वाळेकर, मोहिंदर सिंग, नीता नारंग यांच्यासह टीम जसपालचे सदस्य यांनी प्रयत्न केले.
त्र्यंबकेश्वर डोंगररांगेतून जोराने वाहणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांचा परिणाम सायकल चालवताना जाणवल्याने रेस पूर्ण करणे आव्हानात्मक असल्याचे यावेळी सहभागी सायकलपटूंनी सांगितले. जसपलचे आजोबा गुरुदेवसिंग विर्दी यांनी टीम जसपलकडे १० सायकल्स सुपूर्द करण्यात येणार असल्याचे सांगितले. ओरोबोरस सायकल उत्पादक कंपनीने तीन सायकल उपलब्ध करून दिल्या असून राज्य व राष्ट्रीय स्पर्धात खेळण्यासाठी आवश्यक असेल त्या खेळाडूंना या सायकलस देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या रेसचे डायरेक्टर असलेले मितेन ठक्कर यांचे विशेष मार्गदर्शन २० वर्षाखालील सायकलपटूंना मिळणार असून लवकरच तीन दिवसांचे प्रशिक्षण शिबीर भरविण्यात येणार आहे. मितेन ठक्कर हे युनायटेड किंग्डम येथून तिसऱ्या श्रेणीचे प्रशिक्षक प्रशिक्षण पूर्ण की असून ते भारतातील अग्रगण्य सायकलिंग प्रशिक्षक म्हणून गणले जातात.
असा आहे स्पर्धेचा निकाल :
१३ वर्षाखालील मुली (७ किमी)
प्रथम : ऋतू भामरे (नाशिक, १७ मिनिट ३४ सेकंद) ; द्वितीय : सुजाता वाघेरे (नाशिक, १७ मिनिट ४६ सेकंद); तृतीय : साक्षी धबालीया (मुंबई, २३ मिनिट ६ सेकंद)
१३ वर्षाखालील मुले (७ किमी)
प्रथम : मल्हार नवले (नाशिक, १५:४९), द्वितीय : शौर्य मकवाना ( मुंबई, १६:०९), तृतीय : रेहान हकीमी (मुंबई, १८:०८)
१३ ते १६ वयोगट मुली (७ किमी)
प्रथम : संध्या कोकाटे (१६:०४), द्वितीय : प्रिया धबालीया (मुंबई, १६:०६), तृतीय : वैष्णवी पिल्लई (मुंबई, १६:२३)
१३ ते १६ वयोगट मुले (७ किमी)
ओम महाजन (नाशिक, १२:३०), निसर्ग भामरे (नाशिक, १३:००), जतीन जोशी (नाशिक, १३:३२)
१६ ते २० वयोगट मुले (१५ किमी)
विवेक वाईकर (पुणे, २६:५९), निर्मित शाह (मुंबई, २९:२९), ऱ्हिदम देव (नाशिक, ३०:२१)
१६ ते २० आणि २० ते ४० वयोगट महिला (२७ किमी)
प्रांजल पाटोळे (नाशिक, ०१:०१:१४), अनुजा उगले (नाशिक, ०१:०२:३१) दुसऱ्या क्रमांकावर राहिली.
२० ते ४० वयोगट पुरुष (२७ किमी)
सोनू गुप्ता (मुंबई, ४५:४०), दर्शन दुबे (नाशिक, ५०:१८), राकेश पावरा (नाशिक, ५०:३३)
वेटरन गट महिला (२७ किमी)
नंदा गायकवाड (नाशिक, ०१:१३:१४), मनीषा रौंदळ (नाशिक, ०१:१४:०२)
वेटरन गट पुरुष (२७ किमी)
माणिक निकम (नाशिक, ५२:१५), महेंद्र महाजन (नाशिक, ५२:४१) दिनकर पाटील (नाशिक, ५३:१६)