साल १९९६च्या हंगामात न्यूझीलंडचा संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर ५ वनडे व २ कसोटी सामने खेळण्यासाठी आला होता. दौऱ्याची सुरुवात वनडे मालिकेने झाली. पहिला व तिसरा सामना वेस्ट इंडिजने तर दुसरा सामना न्यूझीलंड संघाने जिंकला होता. त्यामुळे चौथ्या वनडे सामन्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते.
वेस्ट इंडिज मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी उत्सुक होते तर न्यूझीलंड मालिकेत बरोबर साधण्यासाठी. When the whole New Zealand team was awarded the Man of the Match in 1996.
विशेष म्हणजे हा चौथा सामना न्यूझीलंड संघाने जिंकलाही. अतिशय कमी धावा झालेल्या या वनडे सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंड संघाने ३५.५ षटकांत सर्वबाद १५८ धावांपर्यंत मजल मारली.
न्यूझीलंडकडून क्रेग स्पेअरमन (४१), ख्रिस क्रेन्स (२९), ली गर्मन (१९) व नेथन एस्टल (२०) यांनीच दोन अंकी धावसंख्या केली. बाकी ७ खेळाडूंना एक अंकी धावसंख्येवरच अवलंबुन रहावे लागले.
१५९ धावांचे लक्ष मैदानात घेऊन उतरलेल्या वेस्ट इंडिज संघ ४९.१ षटकांत सर्वबाद १५४ धावांपर्यंतच मजल मारु शकला. व त्यांचा ४ धावांनी पराभव झाला. यात न्यूझीलंडकडून ६ गोलंदाजांनी गोलंदाजी केली. त्यात दिपक पटेल (१), गॅविन लार्सन (२), ख्रिस हॅरिस (१), जस्टिन वाॅ (२), नेथन एस्टल (१) व ख्रिस क्रेन्स (२) यांनी विकेट्स घेतल्या. तसेच ख्रिस हॅरिसने एका खेळाडूला धावबाद केले.
न्यूझीलंडचा हा विजय खऱ्या अर्थाने पुर्णपणे सांघिक कामगिरीमुळे झाला होता. सर्व संघाने चांगली कामगिरी केल्यामुळे न्यूझीलंडच्या ११ खेळाडूंना या सामन्यात सामनावीर पुरस्कार देण्यात आला. पुढे ५वा वनडे सामना जिंकत वेस्ट इंडिजने मालिका ३-२ने जिंकली. Team Man of the Match award.
बरोबर ५ महिन्यांनी पुन्हा असंच काही घडलं-
१९९६मध्ये पाकिस्तान संघ इंग्लंड दौऱ्यावर आला होता तेव्हा १ सप्टेंबर १९९६ रोजी झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात पाकिस्तान संघातील ११ खेळाडूंना सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या सामन्यात पाकिस्तानकडून ४ गोलंदाजांनी विकेट्स घेतल्या होत्या तर ६ फलंदाजांनी दोन अंकी धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर बळी मिळवणारा मुंबईकर ‘निलेश कुलकर्णी’
Video: भारताच्या त्रिशतकवीराने तोडले चहलचे हॅट्रिकचे स्वप्न, पण फिरकीपटूने दाखवली खिलाडूवृत्ती
Video: नुसती निराशा… राजस्थानविरुद्ध रोहित फक्त १० धावा करून बाद, पत्नी रितिकाने मुरडले नाक