पुणे । ई2डी स्पोर्ट्स यांच्या तर्फे आयोजित एन्ड्युरन्स प्रिमिअर कॉर्पोरेट लीग क्रिकेट 2019 स्पर्धेत साखळी फेरीत टीम वन आर्किटोक्ट संघाने बुरहान प्रायव्हेट लिमिटेड संघाचा तर ईक्यु टेक्नोलॉजी संघाने टेट्रा पॅक संघाचा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
ई2डी क्रिकेट मैदान, लवळे येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत सचिन साठोडच्या दमदार 93 धावांच्या बळावर टीम वन आर्किटोक्ट संघाने बुरहान प्रायव्हेट लिमिटेड संघाचा 58 धावांनी दणदणीत पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना सचिन साठोडच्या 93 व निशांत नगरकरच्या 86 धावांसह टीम वन आर्किटोक्ट संघाने 20 षटकात 3 बाद 212 धावांचा डोंगर रचला. 212 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अनिरूध्द अंबुलकरच्या अचूक गोलंदाजीने बुरहान प्रायव्हेट लिमिटेड संघाचा डाव 20 षटकात 8 बाद 154 धावांत रोखला व संघाला विजय मिळवून दिला.46 चेंडूत 93धावा करणारा सचिन साठोड सामनावीर ठरला.
दुस-या लढतीत रोहन पाटीलच्या 46 धावांच्या जोरावर ईक्यु टेक्नोलॉजी संघाने टेट्रा पॅक संघाचा 6 धावांनी पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना ईक्यु टेक्नोलॉजी संघाने 18.3 षटकात सर्वाबाद 120 धावा केल्या. 120 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गणेश चांदगुडे व गौरव पोलेकर यांच्या अचूक गोलंदाजीपुढे टेट्रा पॅक संघ 20 षटकात 7 बाद 114 धावांत गारद झाला. रोहन पाटील सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
टीम वन आर्किटोक्ट- 20 षटकात 3 बाद 212 धावा(सचिन साठोड 93(46), निशांत नगरकर 86(46), अब्दैली मोटरवाला 1-17, सुरज गोंड 1-39, फख्रुुंदीन घोडनाडीवाला 1-12) वि.वि बुरहान प्रायव्हेट लिमिटेड- 20 षटकात 8 बाद 154 धावा(हुसेन निमुचवाला नाबाद 42(33), अली जेपी 41(26), अनिरूध्द अंबुलकर 2-9, विजय शिंदे 1-7, हॉरी सिंग 1-18) सामनावीर- सचिन राठोड
टीम वन आर्किटोक्ट संघाने 58 धावांनी सामना जिंकला
ईक्यु टेक्नोलॉजी- 18.3 षटकात सर्वाबाद 120 धावा(रोहन पाटील 46(47), श्र(ज्ञानेश्वर राठोड 14(11), गणेश चांदगुडे13(22), प्रतिक मुर्तडक 3-33, स्नेहल जंगी 2-15, आदित्य उपगडे 1-10) वि.वि टेट्रा पॅक- 20 षटकात 7 बाद 114 धावा(शिवानंद पाटील 50(48), अनुज पाल 44(38),गणेश चांदगुडे 2-17, गौरव पोलेकर 2-16, गौरव पोलेकर 1-26) सामनावीर- रोहन पाटील
ईक्यु टेक्नोलॉजी संघाने 6 धावांनी सामना जिंकला.