विक्रम दोन प्रकारचे असतात, एक चांगले आणि दुसरे लाजीरवाणे. चांगल्या विक्रमांमुळे नेहमीच खेळाडू आणि संघाचा गौरव होत असतो. तसेच, लाजीरवाण्या विक्रमांमुळे खेळाडू आणि संघांवर मान खाली घालण्याची वेळ येते. अशीच काहीशी स्थिती आता श्रीलंका संघाची झाली आहे. श्रीलंका संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेत खूपच खराब कामगिरी करत आहे. त्यांना फक्त 2 सामने जिंकण्यात यश आले आहे. अशात त्यांनी आपल्या अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध खराब सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्या नावावर लीजारवाणा विक्रम नोंदवला गेला.
श्रीलंकेचा लाजीरवाणा विक्रम
या सामन्यात इंग्लंड (England) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. सलग 3 पराभवाचे तोंड पाहून आलेला श्रीलंका (Sri Lanka) संघ इंग्लंडविरुद्ध मोठे आव्हान उभे करायचे, या हेतूने मैदानात उतरला होता. मात्र, त्यांनी पॉवरप्लेमध्ये म्हणजेच पहिल्या 10 षटकातच 5 विकेट्स गमावल्या. या 5 विकेट्सपैकी 3 विकेट्स ट्रेंट बोल्ट (Trent Boult) याने, तर इतर दोन विकेट्स लॉकी फर्ग्युसन आणि टीम साऊदी यांनी घेतल्या.
श्रीलंकेने या 5 विकेट्स गमावताच त्यांच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला. क्रिकबजनुसार, विश्वचषक 2023 स्पर्धेत पहिल्या 10 षटकात सर्वाधिक विकेट्स गमावणाऱ्या संघांच्या यादीत श्रीलंकेची नोंद झाली. त्यांनी या स्पर्धेत आतापर्यंत पहिल्या 10 षटकात सर्वाधिक 20 विकेट्स गमावल्या आहेत. श्रीलंकेपाठोपाठ या यादीत दुसऱ्या स्थानी बांगलादेश आहे. त्यांनी पहिल्या 10 षटकात 18 विकेट्स गमावल्या आहेत. तसेच, इंग्लंड संघ तिसऱ्या स्थानी आहे. त्यांनी विश्वचषकाच्या पहिल्या 10 षटकात आतापर्यंत एकूण 16 विकेट्स गमावल्या आहेत. याव्यतिरिक्त यादीतील चौथा संघ नेदरलँड्स आहे. नेदरलँड्सने विश्वचषक 2023 स्पर्धेत पहिल्या 10 षटकात 14 विकेट्स गमावल्या आहेत.
वनडे विश्वचषक 2023मध्ये पहिल्या 10 षटकात सर्वाधिक विकेट्स गमावणारे संघ
20 – श्रीलंका*
18 – बांगलादेश
16 – इंग्लंड
14 – नेदरलँड्स
श्रीलंकेची स्पर्धेतील कामगिरी
श्रीलंका संघाच्या स्पर्धेतील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्यांनी आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. त्यात त्यांना फक्त 2 सामने जिंकता आले आहेत. उर्वरित 6 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. ते 4 गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये सध्या नवव्या स्थानी आहेत. (Teams losing most wickets in Overs 1-10 at World Cup 2023 sri lanka on the top)
हेही वाचा-
दिग्गजांना पछाडत बोल्टने घडवला इतिहास, बनला विश्वचषकात न्यूझीलंडसाठी ‘अशी’ कामगिरी करणारा पहिला गोलंदाज
पीसीबीकडून इंझमाम उल हकचा राजीनामा मंजुर, लावले होते ‘हे’ मोठे आरोप