आयपीएल २०२२ (IPL 2022) स्पर्धा येत्या काही महिन्यात पार पडणार आहे. या स्पर्धेपूर्वी खेळाडूंचे मेगा ऑक्शन पार पडणार आहे. या ऑक्शनपूर्वी (Ipl 2022 mega auction) सर्व संघांनी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. त्यापैकीच एक म्हणजे २०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाला जेतेपद मिळवून देणारा कर्णधार डेविड वॉर्नर (David Warner).
आयपीएल २०२१ स्पर्धेत साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरल्यामुळे त्याला सनरायझर्स हैदराबाद संघाने कर्णधारपदावरून काढण्याचा निर्णय घेतला होता, तर आगामी हंगामासाठी त्याला रिलीज करण्यात आले आहे. या स्पर्धेत फ्लॉप ठरल्यानंतर त्याने आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत (ICC T20 world cup) अप्रतिम कामगिरी करत मालिकावीर पुरस्कार पटकावला होता. ही कामगिरी पाहता त्याला आगामी मेगा ऑक्शनमध्ये प्रत्येक संघ आपल्या संघात स्थान देण्याच्या प्रयत्नात असणार आहे. चला तर पाहूया असे ३ संघ जे त्याला डेविड वॉर्नरवर लाखांची बोली लावून संघात स्थान देऊ शकतात.
१) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal challengers Bangalore):
विराट कोहली (Virat Kohli) आगामी हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे नेतृत्व करताना दिसून येत नाहीये, तर एबी डिविलियर्सने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या हंगामासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली आणि मोहम्मद सिराजला रिटेन केले आहे.
एबी डिविलियर्सने निवृत्ती जाहीर केल्यानंतर, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला एका अनुभवी फलंदाजाची आवश्यकता आहे. तसेच एका चांगल्या कर्णधाराची देखील आवश्यकता आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ डेविड वॉर्नरला आपल्या संघात स्थान देऊ शकतो. तो डावाची सुरुवात करण्यासह संघाचे नेतृत्व देखील करू शकतो.
२) पंजाब किंग्ज (Punjab Kings) :
सलग ४ वर्ष पंजाब किंग्ज संघाकडून खेळल्यानंतर केएल राहुलने (Kl Rahul) पंजाब किंग्ज संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पंजाब किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने सलग ४ वर्ष सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम केला होता. आता केएल राहुल बाहेर झाल्यानंतर पंजाब किंग्ज संघाला एका चांगल्या फलंदाजाची आणि कर्णधाराची आवश्यकता आहे. तो मयांक अगरवाल सोबत मिळून डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतो.
३) कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders)
ओएन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली होती. २०२० मध्ये हा संघ ७ व्या स्थानी होता. तर गेल्या हंगामात जोरदार पुनरागमन करत या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला चेन्नई सुपर किंग्ज संघाने पराभूत केले होते.
आगामी हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाने कर्णधार ओएन मॉर्गनला रिलीज केले आहे. तसेच युवा फलंदाज शुबमन गिलला देखील रिलीज केले आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघ एका चांगल्या कर्णधाराच्या आणि सलामीवीर फलंदाजाच्या शोधात असणार आहे. त्यामुळे डेविड वॉर्नर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
महत्वाच्या बातम्या :
झुलन गोस्वामीच्या भूमीकेत अनुष्का शर्माचा जलवा! ‘चकदा एक्सप्रेस’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
पंतशी पंगा, मग होणार दंगा! एडेन मार्करमच्या स्लेजिंगला रिषभचे सडेतोड उत्तर, पाहा व्हिडिओ
हे नक्की पाहा :