आयपीएलमध्ये प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादनं अनेक मोठ-मोठे विक्रम रचले आहेत. त्यांच्या नावे आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या आहे. तसेच आयपीएलमधील दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्याही त्यांच्याच नावे आहे. मात्र धावांचा पाठलाग करताना हैदरबादची 200 रन करताना देखील दमछाक होते. असं आम्ही म्हणत नाही तर ही आकडेवारी सांगते.
गुरुवारी (25 एप्रिल) हैदराबाद येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं सनरायजर्सचा 35 धावांनी पराभव केला. या सामन्यात सनरायजर्सची टीम 207 धावांचा पाठलाग करू शकली नाही.
आयपीएलच्या इतिहासात सनरायझर्स हैदराबादची टीम एकूण 13 वेळा 200 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली आहे. परंतु त्यापैकी 12 वेळा त्यांना यश मिळालं नाही. हैदराबादनं केवळ एक वेळा 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे.
ही कामगिरी त्यांनी आयपीएल 2023 मध्ये केली होती. आयपीएलच्या मागील हंगामात सनरायझर्स हैदराबादनं राजस्थान रॉयल्सविरुद्ध 215 धावांचा पाठलाग करताना विजय मिळवला होता. त्यापूर्वी त्यांचा सर्वोच्च धावांचा यशस्वी पाठलाग 199 होता, जो त्यांनी 2019 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्धच केला होता.
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा 200 पेक्षा अधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करणाऱ्या संघांबद्दल बोलायचं झालं तर, या लिस्टमध्ये पंजाब किंग्ज अव्वल स्थानी आहे. त्यांनी 6 वेळा हा कारनामा केला आहे. दुसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सची टीम आहे, ज्यांनी 5 वेळा ही कामगिरी केली आहे. यानंतर कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचा क्रमांक लागतो. या चारही संघांनी 3-3 वेळा 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी 1-1 वेळा 200 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना विजय मिळवला आहे. तर गुजरात टायटन्स ही एकमेव टीम आहे, जी अद्याप एकदाही ही कामगिरी करू शकली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
“आम्ही प्रत्येक सामना जिंकू शकत नाही…”, आरसीबी विरुद्धच्या पराभवानंतर नाराज पॅट कमिन्सची प्रतिक्रिया
किंग कोहलीचा मोठा विक्रम ! ‘अशी’ कामगिरी करणारा विराट एकमेव खेळाडू, वाचा कोहलीच्या खास विक्रमाबद्दल…