भुवनेश्वर, ३१ डिसें.: आज झालेल्या सामन्यात तेलुगू योद्धासने ओडिशा जगरनॉट्सवर १ गुणाने निसटता विजय मिळवला, हा सामना अल्टीमेट खो-खोच्या सीझन दोन मध्ये कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर झाला. आजच्या सामन्यात दिपेश मोरेला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
कालपर्यंत झालेल्या बाराव्या सामन्यापर्यंत चेन्नई क्विक गन्सचा रामजी कस्यप १०.२३ मि. संरक्षण, ४० गुणांसह संरक्षण, आक्रमणात तसेच आकाषीय सूर मारण्यात (१२ वेळा) व सूर मारून बाद करण्यात (२६ गुण) अल्टीमेट खो-खो सीझन २ सध्या प्रथम क्रमांकावर आहे. चेन्नईचाच दुर्वेश साळुंके वजीर म्हणून २४ गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे. स्तंभात खेळाडू बाद करणे या प्रकारात मुंबई खिलाडीसचा अनिकेत पोटे (६ वेळा), सहज स्पर्शाने बाद करण्यात मुंबईचाच गजानन शेंगाळ (२० गुण) प्रथम क्रमांकावर आहे.
आज झालेल्या तेराव्या सामन्यात तेलुगू योद्धासचा ओडिशा जगरनॉट्सवर २९-२८ (मध्यंतर १४-१५) असा १ गुणाने निसटता विजय मिळवला. गतविजेत्या ओडिशा जगरनॉट्सला मध्यंतराला मिळालेल्या एक गुणाची आघाडी कामी आली नाही. ओडिशा जगरनॉट्सने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण घेतले व तेलुगू योद्धासला आक्रमणासाठी आमंत्रित केले.
आज झालेल्या सामन्यात तेलुगू योद्धासने ओडिशा जगरनॉट्सवर जोरदार खेळी करताना वर विजय साजरा केला. पहिल्या टर्नमध्ये ओडिशा जगरनॉट्सच्या ओंकार सोनवणे १.२० मि संरक्षण दिपेश मोरे १.४० मि. संरक्षण व बी. निखीलने ड्रीम रन्सचा १ गुण मिळवून दिला, रोहन शिंगाडेने (१.२२ मि. संरक्षण) ड्रीम रन्सचे १ गुण मिळवून दिला, तर तेलुगू योद्धासच्या रुद्र थोपटेने ६ गुण मिळवले. तर दुसऱ्या टर्न मध्ये तेलुगू योद्धासच्या प्रतिक वाईकर १.५५ मि. संरक्षण, आदित्य गणपुले २.२६ मि. संरक्षण व ड्रीम रन्सचे ४ गुण मिळवून दिले, ४.४२ मिनिटात पहिली तुकडी बाद झाली. अवधूत पाटील व ध्रुवचे संरक्षण उत्कृष्ट झाले. तर ओडिशाच्या गौतम एम के व दिपक साहूने चार-चार गुण मिळवून दिले.
मध्यंतरानंतर तिसऱ्या टर्न मध्ये ओडिशा जगरनॉट्सच्या अविनाश देसाईचे एक मि. पेक्षा जास्त संरक्षण केले. तर पहिली तुकडी अडीच मिनिटात बाद झाली. तर दुसरी तुकडी १.१५ मिनिटात बाद झाली. तर तेलुगू योद्धासच्या प्रतिक वाईकरने आक्रमणात ६ गुण मिळवले. तर शेवटच्या व चौथ्या टर्न मध्ये तेलुगू योद्धासच्या किरण वसावेने १.२० मि. संरक्षण केले, अरुण गुणकीने एक मि. पेक्षा जास्त संरक्षण करून ड्रीम रन्सचा १ गुण मिळवून दिला. प्रसाद राडियेने दीड मिनिटा पेक्षा जास्त संरक्षण केले. या सामन्यात प्रतिक वाईकरला उत्कृष्ट आक्रमक, आदित्य गणपुले उत्कृष्ट संरक्षक तर दिपेश मोरेला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
सोमवारी पहिला सामना गुजरात जायंट्स व चेन्नई क्विक गन्स यांच्यात तर दुसरा सामना राजस्थान वॉरियर्स व तेलुगू योद्धास यांच्यात रंगेल. खो खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने अमित बर्मन यांनी अल्टीमेट खो खो स्पर्धा सुरु केली असून हे सर्व अल्टीमेट खो-खो चे सामने दररोज सायंकाळी ७.३० पासून सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेल व सोनी लीव अॅपवर थेट पहाता येतील. (Telugu Yoddhas narrow win over Odisha Juggernauts, Dipesh More gets all-rounder award)
महत्वाच्या बातम्या –
शिवप्रबोधन मंडळ आयोजित कबड्डी स्पर्धा । ओम वर्तकनगर, होतकरू, छत्रपती शिवाजी यांची महिलांत उपांत्य फेरीत धडक.
‘या’ 5 गोलंदाजांनी 2023 मध्ये केल्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शिकार, फक्त एका भारतीयाने मिळवले स्थान