दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यात बुधवारी (१९ जानेवारी) एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. दक्षिण अफ्रिका संघाने या सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन केले. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण अफ्रिका संघाची सुरुवात काही खास झाली नव्हती, पण पुढे कर्णधार टेंबा बावूमा (temba bavuma) आमि रासी वॅन डर ड्यूसेन (rassie van der dussen) या दोघांनी शतकी खेळी केली आणि संघाला अपेक्षित धावसंखेपर्यंत घेऊन गेले. दरम्यान, मायदेशातील भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात असे प्रदर्शन करणारी बावूमा आणि ड्यूसेन ही तिसरी जोडी ठरले आहेत.
सामन्यात दक्षिण अफ्रिकेने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आल्यानंतर दक्षिण अफ्रिकेची पहिली विकेट अवघ्या १९ धावांवर आणि सामन्याच्या पाचव्या षटकात पडली. त्यानंतर ६८ धावसंख्येवर दक्षिण अफ्रिकेने त्यांच्या तिन विकेट्स गमावल्या. परंतु पुढे चौथ्या विकेटसाठी टेंबा बावूमा आणि रासी वॅन डर ड्यूसेन यांनी १८४ चेंडूत २०४ धावांची भागीदारी केली आणि संघाला २९६ धावांपर्यंत घेऊन गेले.
व्हिडिओ पाहा- २०११ विश्वचषक भारताचे हिरो, ज्यांचे योगदान आज कोणाला आठवत नाही |
मायदेशात भारताविरुद्ध एकदिवसीय सामना खेळताना दक्षिण अफ्रिकेच्या दोन फलंदाजांनी शतक करण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी दोन वेळा ही कामगिरी दक्षिण अफ्रिकेच्या खेळाडूंनी केली होती. बावूमा आणि ड्यूसेन एका सामन्यात प्रत्येकी शतक करणारी तिसरी दक्षिण अफ्रिकी जोडी ठरले आहेत.
२०१३ मध्ये भारताविरुद्धच्या एका एकदिवसीय सामन्यात क्विंटन डी कॉक आणि हसिम आमला या दोघांनी शतकी खेळी केली होती. त्यानंतर त्याच वर्षी क्विंटन डी कॉक आणि एबी डिविलियर्स यांनी भारताविरुद्ध एकदिवसीय सामना खेळताता शतक केले होते. आता या यादीत तिसरी जोडी बावूमा आणि ड्यूसेन यांची सामील झाली आहे.
टेंबा बावूमाने या सामन्यात ११० धावा केल्या आणि जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर तंबूत परतला. बावूमाने या धावा करण्यासाठी एकूण १४३ चेंडूंचा सामना केला. यामध्ये त्याच्या आठ चौकारांचा समावेश होता. तर ड्यूसेन या सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने ९६ चेंडूंचा सामना करून १२९ धावा केल्या. या दोघांच्या तुफान फलंदाजीच्या जोरावर दक्षिण अफ्रिका संघ भारताला विजयासाठी २९७ धावांचे लक्ष्य देऊ शकला.
महत्वाच्या बातम्या –
कसोटी मालिका गमावूनही कोहली, बुमराहची आयसीसी क्रमवारीत ‘उंच उडी’, रोहितही टॉप-१० मध्ये
केएल राहुलच्या हाती वनडे संघाची सुत्रे येताच ३८ वर्षांनंतर पुन्हा घडला इतिहास, वाचा सविस्तर
व्हिडिओ पाहा –