आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आपल्या धारदार गोलंदाजीने फलंदाजांपुढील अडचणी वाढवणाऱ्या उमरान मलिक याला भारतीय संघात जागा मिळाली आहे. तो येत्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील टी२० मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग आहे. ९ जूनपासून ही ५ सामन्यांची टी२० मालिका सुरू होणार आहे. तत्पूर्वी दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार टेंबा बावुमा याने मलिकबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचा प्रभारी केएल राहुल कर्णधार मलिकच्या (Umran Malik) गतीला आपल्या ट्रंप कार्डच्या रूपात वापरण्यासाठी प्रयत्नशील असेल. परंतु दक्षिण आफ्रिकेच्या टी२० संघाचा कर्णधार बावुमाला (Temba Bavuma) वाटते की, त्यांच्या खेळाडूंना अशा वेगाची सवय आहे. मलिकविरुद्धच्या योजनेबद्दल विचारले असता बावुमा म्हणाला की, त्यांना कसलीही (Temba Bavuma On Umran Malik) चिंता नाही.
बावुमा म्हणाला की, “दक्षिण आफ्रिका संघाला वेगवान माऱ्याचा सामना करण्याचा चांगला अनुभव आहे. दक्षिण आफ्रिकेत आम्ही वेगवान गोलंदाजांचा सामना करतच मोठे झालो आहोत. पण कोणत्याही फलंदाजाला सातत्याने १५०किमी दर ताशी वेगाच्या चेंडूचा सामना करायला आवडत नाही. तुम्हाला जितकी तयारी करायची आहे, करा. आमच्याकडेही असे खेळाडू आहेत, जे १५० किमी दर ताशीच्या वेगाने गोलंदाजी करू शकतात. आमच्याकडेही असे हत्यार आहेत.”
केएल करणार भारतीय संघाचे नेतृत्त्व
२ महिन्यांच्या आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. रोहित शर्माही विश्रांतीवर असल्याने त्याच्याजागी केएल राहुलकडे संघाची कमान सोपवली गेली आहे. तर विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या अनुभवी खेळाडूंनाही विश्रांती दिली गेली आहे.
टी२० मालिकेचे वेळापत्रक-
पहिला टी२०, ९ जून, दिल्ली
दुसरी टी२०, १२ जून, कटक
तिसरी टी२०, १४ जून, विझाग
चौथी टी२०, १७ जून, राजकोट
पाचवी टी२०, १९ जून, बेंगळुरू
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ: केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘लोकांनी तूला संपल्यात जमा केले होते, पण तू…’, आयपीएल जिंकल्यानंतर हार्दिकचं भाऊ कृणालकडून कौतुक
ओहो! गुजरात आयपीएलचा चँपियन बनल्यानंतर ट्रॉफी घेऊन झोपले ‘नेहरा कुटुंबीय’, Photo चर्चेत