टेंबा बवुमाच्या नेतृत्वातील दक्षिण अफ्रिका संघ रविवारी भारताविरुद्धची एकदिवसीय मालिका (sa vs ind odi series) ३-० अशा फरकाने जिंकला. शेवटच्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण अफ्रिकेने अवघ्या ४ धावांनी विजय मिळवला. भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत देखील दक्षिण अफ्रिकेने २-१ असा विजय मिळवला होता. या दोन्ही मालिका जिंकल्यानंतर कर्णधार टेंबा बवुमा (Temba Bavuma) याने त्याची खास प्रतिक्रिया दिली आहे.
केपटाऊनमधील शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ विजय मिळवेल असे वाटत असताना दक्षिण अफ्रिकेने शेवटच्या क्षणी सामन्यात पुनरागमन केले आणि विजय मिळवला. याविषयी बोलताना बवुमा म्हणाला की, “शेवटी परिस्थिती थोडी रोमांचक झाली होती. एक वेळी आम्हाला वाटले होते की, सामना आमच्या हातातून गेला आहे, पण शेवटी आम्ही पुनरागमन करण्यात यशस्वी ठरलो.”
आमचे मिशन पूर्ण झाले – टेंबा वाबुमा
एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामने जिंकल्यानंतर बवुमा म्हणाला की, “हा विजय खूप समाधानकारक आहे आणि एका संघाच्या रूपात आम्ही मिशन पूर्ण केले आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी आम्हाला कोणीच विजयासाठी दावेदार मानत नव्हते. मात्र, मला आशा आहे की, आमच्या कामगिरीनंतर आम्हाला काही नवीन चाहते मिळाले असतील.”
भारताविरुद्धची कसोटी मालिका सर्वात कठीण
भारताविरुद्ध खेळलेल्या कसोटी मालिकेविषयी बोलताना बवुमा म्हणाला की, “भारताविरुद्धची कसोटी मालिका माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण मालिका होती. भारतीय गोलंदाज चांगली गोलंदाजी करत होते, तसेच क्षेत्ररक्षण देखील चांगले होते. परंतु आम्ही रोज विचार करायचो की, आजचा दिवस आपला कसा बनवायचा. एकदिवसीय मालिका देखील काही सोपी नव्हती, ती देखील खूप आव्हानात्मक होती. याठिकाणी ऊर्जा जास्त होती आणि परिस्थिती भारताप्रमाणेच होती. तरीही कसोटी आणि एकदिवसीय या दोन्ही मालिका जिंकण्यामध्ये आम्ही यशस्वी राहिलो.”
शेवटच्या वनडे सामन्यात महत्वपूर्ण शतक करणारा दक्षिण अफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकचेही बवुमाने कौतुक केले. डी कॉकची साथ देण्यासाठी रासी वॅन डर ड्यूसेनचेही त्याने कौतुक केले. त्याने संघातील गोलंदाज आणि सर्व फलंदाजांनी चांगले सांघिक प्रदर्शन केल्याचे सांगितले. या दोन्ही मालिकेत विजय मिळवल्यामुळे दक्षिण अफ्रिका संघाचा आत्मविश्वास वाढल्याचे देखील बवुमा म्हणाला.
महत्वाच्या बातम्या –
रिषभ पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर विराटची जहरी रिॲक्शन पाहिली का? व्हिडिओ आहे चर्चेत
पराभव, पराभव, पराभव! ‘कर्णधार’ राहुलचा पुढचा मार्ग खडतर, पहिल्याच मालिकेत लाजिरवाणा विक्रम नावे
जगाने पहिल्यांदाच पाहिली विराटच्या कन्येची झलक; पण विरुष्का म्हणतायेत ‘हे’ थांबवा
व्हिडिओ पाहा –