वनडे विश्वचषक 2023 मध्ये दक्षिण आफ्रिका संघाची कामगिरी उत्कृष्ट झाली. संघातील खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करत उपांत्य फेरीपर्यंत आपल्या संघाला नेले होते. उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून त्यांचा निसटता पराभव झाला. या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमा याच्यावर जोरदार टीका होत आहे. त्याने या स्पर्धेत सातत्याने खराब कामगिरी केली. तरीदेखील कर्णधार असल्याने तो संघात टिकून असल्याचे बोलले गेले. सोशल मीडियावर होत असलेल्या या अनेक आरोपांवर आता बवुमा याने मौन सोडले आहे.
भारतात आयोजित झालेल्या या विश्वचषका दक्षिण आफ्रिका संघ पहिल्या सामन्यापासून शानदार कामगिरी करत होता. स्पर्धेत त्यांना केवळ दोन पराभव पहायला मिळाले. मात्र उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने त्यांच्यावर मात केली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बवुमा हा दुखापतग्रस्त असताना देखील मैदानात उतरला होता. या सामन्यात तो चार चेंडू खेळून एकही धाव न करता तंबूत परतला.
या संपूर्ण विश्वचषकात त्याची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. तो या स्पर्धेत आठ सामने खेळताना केवळ 135 धावा करू शकला. यामध्ये एकाही अर्धशतकाचा समावेश नव्हता. याच कारणामुळे त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. त्या टीकेबाबत आता उत्तर देताना तो म्हणाला,
“सोशल मीडियावर लोक काय बोलत आहेत याने मला काहीच फरक पडत नाही. यावेळी माझा अंगठा तुटलेला होता त्यावेळी मी देशासाठी खेळलो आहे. तेव्हा हे लोक कोठे होते?”
बवुमा हा सध्या दक्षिण आफ्रिकेच्या वनडे व कसोटी संघाचा कर्णधार असून, तो वनडे संघाच्या नेतृत्वाचा राजीनामा देऊ शकतो असे म्हटले जात आहे.
(Temba Bavuma Speaks After Trolling In ODI World Cup)
हेही वाचा-
जमलं रे! भारतीय क्रिकेटर वेंकटेश अय्यरने उरकला साखरपुडा, जोडप्याचे सुंदर फोटो तुफान व्हायरल
पाकिस्तान संघाच्या गोलंदाजी विभागाची ताकद वाढणार! 2 माजी दिग्गजांवर सोपवली मोठी जबाबदारी, वाचा कोण आहेत ते