---Advertisement---

असा प्रामाणिक क्रिकेटर होणे नाही! नाबाद असतानाही सोडलं मैदान

On: सोमवार, डिसेंबर 28, 2020 9:56 PM
---Advertisement---

सेंच्यूरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका संघात सुरु असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने शानदार कामगिरी करताना २२५ धावांची आघाडी घेतली आहे. त्यांनी पहिल्या डावात सर्वबाद ६२१ धावा केल्या. यात तेंबा बाऊमाने अर्धशतक करत महत्त्वाची कामगिरी बजावली. त्याच्या या खेळीबरोबरच त्याचे त्याने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीमुळेही कौतुक होत आहे.

झाले असे की ९१ व्या षटकात दसून शनका गोलंदाजी करत होता. तो गोलंदाजी करत असताना चौथ्या चेंडूवर बाऊमाने कट शॉट मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी चेंडू बॅटच्या जवळून जात यष्टीरक्षक निरोशान डिकवेल्लाकडे गेला. यावर श्रीलंकन खेळाडूंनी झेलबादसाठी अपील केले. त्यावेळी बाऊमाने त्याच्या बॅटला चेंडू लागला असल्याचा समज करुन पंचांच्या निर्णायाची वाट न पाहता पॅव्हेलियनचा रस्ता धरला. त्यामुळे श्रीलंकन खेळाडूंनी सेलिब्रेशन केले.

मात्र जेव्हा नंतर अल्ट्रा एज दाखवण्यात आले, तेव्हा त्यात दिसले की खरंतर चेंडू बाऊमाच्या बॅटला लागलाच नव्हता. पण तोपर्यंत बाऊमा परत गेला होता. त्यामुळे त्याला बाद घोषित करण्यात आले. बाऊमाने १२५ चेंडूत ७१ धावा केल्या. यात त्याच्या ७ चौकाराचा समावेश आहे. याबरोबरच त्याने १७९ धावांची फाफ डू प्लेसिससह भागीदारीही केली होती.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून बाऊमा व्यतिरिक्त डिन एल्गार(९५) एडेन मार्करम (६८) आणि केशव महाराज (७३) यांनीही अर्धशतकं केली. तसेच फाफ डू प्लेसिसने १९९ धावांची शानदार खेळी केली. त्याचे कारकिर्दीतील पहिले द्विशतक केवळ १ धावेने हुकले. श्रीलंकेकडून हसरंगाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

यानंतर तिसऱ्या तिसराखेर श्रीलंकेने दुसऱ्या डावात १२ षटकात २ बाद ६५ धावा केल्या असून अजून ते १६० धावांनी पिछाडीवर आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

जेव्हा वॉर्नर कोहलीचे रुप धारण करतो..! आयसीसी पुरस्कार विजेत्या विराटला ऑसी दिग्गजाकडून अनोख्या शुभेच्छा 

झहिर म्हणतो, ‘असे’ जर झाले तर भारताला २५ रिव्ह्यू घ्यावे लागलीत

हिम्मत असावी तर अशी! पाय फ्रॅक्चर झाला असूनही ‘या’ दिग्गजाने केली गोलंदाजी, सर्वत्र होतंय कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---