विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. अंतिम सामन्याची जगभरातील क्रिकेटप्रेमी वाट पाहात आहेत. १८ जून ते २२ जूनदरम्यान साउथम्पटन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड असा हा सामना रंगणार आहे. या सामन्यात सर्वात जास्त धावा कोण करणार? तसेच सर्वाधिक बळी कोण टिपणार? यासंदर्भात जगभरातले माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट जाणकार वेगवेगळे तर्कवितर्क लावत आहेत. दरम्यान, भारतीय संघाचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने चेतेश्वर पुजाराच्या फलंदाजीवर टिका करणाऱ्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
भारतीय संघाचा माजी महान फलंदाज सचिनने सध्याचा भारतीय संघाचा कसोटीपटू पुजाराच्या फलंदाजीबद्दल भाष्य केले आहे. सचिनने सांगितले की, भारताच्या कसोटी विजयात पुजाराच्या फलंदाजीचा खूप मोठा वाटा आहे. ऑस्ट्रेलियामधील दमदार प्रवासानंतर सुद्धा पुजारावर चाहत्यांनाकडून टीका करण्यात आली की, पुजारा धावफलक धावते ठेवण्यात मागे पडतो.
सचिनने ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “पुजाराबद्दल हा जो दृष्टीकोन आहे तो चुकीचा आहे. त्याने आजवर भारतीय संघासाठी कसोटी सामन्यात खूप मोलाचा वाटा उचलला आहे. कसोटी सामन्यात तुम्हाला जागा बनवण्यासाठी वेगळ्या प्रकारची भूमिका आणि वेगळ्या प्रकारच्या खेळाडूची गरज असते. जसे आपल्या हाताची बोटे एकसमान नाहीत. तसेच प्रत्येक खेळाडूची भूमिका एकसमान नसते. आजवर पुजाराने फलंदाजी जे काही केले आहे, त्यामुळे भारतीय संघाने कसोटीत भरघोस यश मिळवले आहे. त्याच्या प्रत्येक खेळीवर टीका करण्यापेक्षा त्याने भारतासाठी जो पराक्रम केला त्याची स्तुती केली पाहिजे.”
सचिन पुढे म्हणाला की, “ज्या लोकांनी त्याच्या तंत्रशुद्ध फलंदाजी आणि धावा करण्याच्या क्षमतेवर प्रश्न निर्माण केले. मला नाही वाटत की त्या लोकांनी पुजाराइतकं क्रिकेट खेळले असेल. टी-२० सामन्यांमुळे लोकांचा क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये फक्त एकच शैली पहिली जाते, ती म्हणजे चेंडूला मैदानेबाहेर मारणे. परंतु, कसोटी क्रिकेट तसे नाही. इकडे तुमचा खरा कस लागतो आणि आजवर पुजाराने ते खूप चांगल्या प्रकारे केले आहे.”
सचिनने सांगितले की, “पुजाराबद्दल नेहमी स्ट्राईक रेटची चर्चा होत असते. पण मी सांगू इच्छितो की, आपल्याकडे रिषभ पंत, रवींद्र जडेजासारखे खेळाडू आहेत, जे कधी मोठी आणि ताबडतोड धावसंख्या करू शकतात. पण विरोधी गोलंदाजाना मानसिकरीत्या दमवायचे झाल्यास आपल्याला पुजारा सारख्या खेळाडूची गरज पडते.”
महत्त्वाच्या बातम्या-
दुर्दैवच! २ द्विशतके झळकावणाऱ्या एकमेव फलंदाजावर अन्याय, भारताच्या अंतिम ताफ्यातून बाहेर
किवींना आस्मान दाखवण्यास सज्ज! जड्डूच्या गोलंदाजीवर पंतचा गगनचुंबी षटकार, एकदा पाहाच