कॅपोविटज प्रायव्हेट लिमिटेड, मानेग्रो आणि टॉवर ट्रान्समिशन यांच्या वतीने आयोजित व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या नरेंद्र सोपल मेमोरियल आंतर क्लब टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत टेनिस नट्स पंचायत 1 व एमडब्लूटीए या संघांनी अनुक्रमे गोल्डन बॉईज व पीवायसी या संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
एमएसएलटीए टेनिस कोर्ट, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात एमडब्लूटीए संघाने पीवायसी संघाचा 16-08 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. सामन्यात 60 अधिक गटात एमडब्लूटीएच्या विवेक खडगे व भूषण जोशी यांना पीवायसीच्या योगेश पंतसचिव व सारंग पाबळकर यांनी 5-6(3-7) असे पराभूत करून संघाला आघाडी मिळवून दिली. पण 80 अधिक गटात एमडब्लूटीएच्या सुमंत पॉलने जयदीप वाकणकरच्या साथीत पीवायसीच्या मिहीर दिवेकर व पराग चोप्रा यांचा 6-0 असा सहज पराभव करून संघाची पिछाडी भरून काढली. अखेरच्या 90 अधिक गटात एमडब्लूटीएच्या पार्थ मोहपात्रा व संजय आशेर या जोडीने पीवायसीच्या अमित लाटे व ध्रुव मेड यांचा 6-2 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.
दुसऱ्या सामन्यात रवी कोठारी, राहुल कोठारी, जॉय बॅनर्जी, संदीप बेलोडी यांच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर टेनिस नट्स पंचायत 1 संघाने गोल्डन बॉईज संघाचा 16-09 असा पराभव करून दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:
एमडब्लूटीए वि.वि.पीवायसी 16-08 (60 अधिक गट: विवेक खडगे/भूषण जोशी पराभूत वि.योगेश पंतसचिव/सारंग पाबळकर 5-6(3-7); 80 अधिक गट: सुमंत पॉल/जयदीप वाकणकर वि.वि.मिहीर दिवेकर/पराग चोप्रा 6-0; 90 अधिक गट: पार्थ मोहपात्रा/संजय आशेर वि.वि.अमित लाटे/ध्रुव मेड 6-2);
टेनिस नट्स पंचायत 1 वि.वि.गोल्डन बॉईज 16-09(60 अधिक गट: नितीन सावंत/भुषण सरदेसाई पराभुत वि.मुकुंद जोशी/आशिष पुंगलिया 5-6(4-7); 80 अधिक गट: रवी कोठारी/राहुल कोठारी वि.वि.केदार पाठक/आदित्य उपाध्ये 6-1;90 अधिक गट: जॉय बॅनर्जी/संदीप बेलोडी वि.वि.अमलेश/प्रशांत राजघरीया 6-2)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कार्तिकनंतर ‘हा’ असणार टीम इंडियाचा फिनिशर? संघ व्यवस्थापनाने आताच दिली जबाबदारी
AUSvENG: किती चिडी गेम खेळणार ऑस्ट्रेलिया! ऍरॉन फिंचची थेट अंपायरला शिवीगाळ