लंडन | दोन जुलैपासून लंडन येथे मानाची वर्षातील दुसरी ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा सुरु झाली आहे.
परंपरेप्रमाणे विंम्बलडन स्पर्धेत पहिला रविवार हा सुट्टीचा दिवस असतो.
काल (8 जुलै) रविवार असल्यामुळे विंम्बलडन स्पर्धेत सामन्यांना सुट्टी होती.
या वेळी सुट्टीचा लाभ घेत आपल्या पुढच्या फेरीच्या सामन्यांसाठी विंम्बलडनचा अनभिषिक्त सम्राट रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच हे टेनिसचे तीन दिग्गज ऐक मेकांच्या शेजारच्या कोर्टवर सराव करताना दिसले.
याची माहिती स्वत: राफेल नदालने ट्विट करत दिली.
“रविवारच्या दुपारी विंम्बलडन स्पर्धेसाठी तीन ओळखीचे चेहरे सराव करताना.” अशा शब्दात ट्विट करत रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच सराव करत असतानाचा फोटो शेअर केला.
Mid Sunday practice @Wimbledon with some know guys sharing the three courts 😉 pic.twitter.com/ZIZmeXRFpS
— Rafa Nadal (@RafaelNadal) July 8, 2018
हे दिग्गज सरावासाठी एकत्र आल्याने लंडनवासीयांना सुट्टीच्या दिवशी ही यांच्या खेळाचा आनंद घेता आला.
रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच यांनी मिळुन त्यांच्या कारकिर्दीत 49 ग्रॅन्डस्लॅम विजेतेपद मिळवली आहेत.
येत्या रविवारी (15 जुलै) विंम्बलडच्या पुरुष एकेरीचा अंतिम सामना होणार आहे. यामध्ये टेनिसचे फॅब थ्री आपल्या ग्रॅन्डस्लॅम विजेतेपदाचे अर्धशतक करतात की विंम्बलडनला यावेळी नवा विजेता मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-इंग्लंडच्या चाहत्यांसमोर विंबल्डन आणि फूटबाॅल फायनल पाहण्याचा यक्ष प्रश्न
-सचिनच्या कालच्या एका ट्विटची संपुर्ण दिवसभर चर्चा!