---Advertisement---

भारतासाठी ऍजबस्टन कसोटी महत्त्वाची, जाणून घ्या कसे आहे टेस्ट चँपियनशीप फायनलपर्यंत पोहोचण्याचे गणित

On: शुक्रवार, जुलै 1, 2022 8:59 AM
india-test-team
---Advertisement---

शुक्रवारपासून (०१ जुलै) ऍजबस्टन येथे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पुनर्निधारित पाचवा कसोटी सामना सुरू होत आहे. भारतीय संघासाठी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने हा सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे. जर भारतीय संघ हा सामना जिंकण्यात यशस्वी झाला तर त्यांचा अंतिम सामन्यात पोहोचण्याचा मार्ग मोकळा होईल. मात्र पराभवानंतर भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत नुकसान होऊ शकते.

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (Test Championship 2021-23) चालू हंगामात सर्वाधिक ५ सामन्यांच्या कसोटी मालिका इंग्लंड आणि बांगलादेश संघांनी खेळल्या आहेत. गुणतालिकेत सध्या हे संघ तळाशी आहेत. बांगलादेशचा संघ नवव्या तर इंग्लंडचा संघ आठव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या दोन्हीही संघांसाठी अंतिम सामन्यात पोहोचण्याचा मार्ग अवघड बनला आहे. त्यांनी आता या स्पर्धेतील त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकले, तरीही त्यांना अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास करता येणार नाही.

भारतीय संघाबद्दल (Team India Equations) बोलायचे झाले तर, त्यांच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याच्या आशा जास्त आहेत. जर भारताने ऍजबस्टनवरील कसोटी सामना गमावला, तर त्यांची गुणतालिकेत चौथ्या स्थानी घसरण होईल. असे असले, तरीही त्यांचे अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्याचे दरवाजे बंद होणार नाहीत.

भारतीय संघाने आतापर्यंत ४ कसोटी मालिका खेळल्या आहेत. त्यातील २ मालिका मायदेशात आणि २ मालिका परदेशात झाल्या आहेत. या मालिकांमध्ये भारतीय संघाने एकूण १२ कसोटी सामने खेळले असून ६ सामने जिंकण्यात त्यांना यश आले आहे. तर ३ सामने त्यांनी गमावले आहेत आणि २ सामने अनिर्णीत सुटले आहेत. सध्या भारतीय संघाची विजयी सरासरी ५८.३३ इतकी आहे. 

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय संघाला १ कसोटी मालिका घरच्या मैदानावर व १ कसोटी मालिका परदेशात खेळायची आहे. भारतीय संघाला बांगलादेशचा दौरा करायचा आहे, जिथे विजय मिळवणे भारतासाठी जास्त अवघड नसेल. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेतही भारतीय संघाचे पारडे जड असेल. अशात भारतीय संघ उर्वरित सामन्यांमध्ये चांगले प्रदर्शन करत विजय मिळवण्यात यशस्वी ठरल्यास ते सलग दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात पोहोचू शकतात. 

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

विराटवर पुन्हा ‘ती’ दणकेबाज खेळी खेळण्याची जबाबदारी, जिंकून देऊ शकतो निर्णायक कसोटी

भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्त्व करणारा ३६वा कर्णधार असेल बुमराह, पहिल्या कॅप्टनचे नाव माहितीय का?

‘विराटने शतक नाही केलं तरी चालेल…’, प्रशिक्षक राहुल द्रविडची स्पष्ट भूमिका

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---