दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील अंतिम कसोटी सामना केपटाऊनच्या (Cape town) मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघातील फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले होते. अशा कठीण परिस्थितीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने (Virat Kohli)संयमी अर्धशतकी खेळी केली. ज्यामुळे भारतीय संघाने २०० धावांचा टप्पा ओलांडला. या खेळीमुळे चहूबाजूने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान इंग्लंडच्या माजी महिला क्रिकेटपटूने देखील त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.
केपटाऊन कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाचे सलामीवीर फलंदाज स्वस्तात माघारी परतले होते. ज्यामुळे संघाच्या फलंदाजीची जबाबदारी कर्णधार विराट कोहलीवर आली होती. ही जबाबदारी त्याने योग्यरीत्या पार पाडली. त्याने या डावात ७९ धावांची खेळी करत आपल्या कसोटी कारकिर्दीतील २८ वे अर्धशतक झळकावले. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात २२३ धावसंख्या उभारली होती.
नेहमी आक्रमक फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीने या डावात संयमी खेळी करत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा सामना केला. त्याला ५० धावा करण्यासाठी १५८ चेंडूंचा सामना करावा लागला. त्याची ही खेळी पाहून , भारतीय मूळच्या माजी इंग्लिश क्रिकेटपटू आणि समलोचक ईशा गुहा (Isa Guha) यांनी ट्वीट केले आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिले की, “मी कोहलीची फलंदाजी पाहत आहे. त्याच्या (कोहली)सारखा फलंदाज मिळणे हे कसोटी क्रिकेटचे भाग्य आहे.”
Just love watching Kohli bat. Test cricket is lucky to have him #SAvIND
— Isa Guha (@isaguha) January 11, 2022
विराट कोहलीने या डावात २०१ चेंडूंमध्ये १२ चौकार आणि १ षटकारांचा साहाय्याने ७९ धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याला कागिसो रबाडाने बाद करत माघारी धाडले होते. विराट कोहली या डावात एकहाती झुंज देत होता. यादरम्यान तो बाद होऊन माघारी परतला. उमेश यादव नॉन स्ट्राइकवर असताना विराट कोहली एक धाव घेण्याच्या प्रयत्नात होता. यादरम्यान त्याच्या बॅटचा कडा घेत, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेला आणि तो बाद झाला.
महत्वाच्या बातम्या :
‘कॅप्टन’ कोहलीचा ‘विराट’ कारनामा! दक्षिण आफ्रिकेत ‘अशी’ कामगिरी करणारा तिसराच कर्णधार
विराटच्या शतकाचा दुष्काळ संपता संपेना! इतके दिवस, इतके डाव शंभरीविणा
हे नक्की पाहा: