जगभरात सुरुवातीला क्रिकेट हे फक्त एक प्रकारात खेळले जात होते. ते म्हणजे कसोटी क्रिकेट. मात्र, वनडेनंतर आता सध्याच्या काळात क्रिकेट टी20 सोबतच टी10 प्रकारातही खेळले जात आहे. त्यामुळे अनेकदा अशी चर्चा रंगते की, कसोटी क्रिकेट धोक्यात आहे. असे असले, तरीही श्रीलंका संघाचा दिग्गज अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज याला विश्वास आहे की, कसोटी क्रिकेटच्या अस्तित्वाला कोणताही धोका नाहीये. मॅथ्यूजनुसार, टी10 आणि टी20 लीगचे महत्त्व आगामी काळात वाढत जाईल, पण कसोटी क्रिकेटमधील प्रेक्षकांचा रस कमी होणार नाही. मॅथ्यूजने कसोटी क्रिकेटला अव्वल क्रमांकाचा प्रकार म्हटले आहे.
अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) याच्याविषयी बोलायचं झालं, तर तो सध्या अबू धाबी ग्लोबल टी10 (Abu Dhabi Global T10 League) लीगमध्ये भाग घेत आहे. मॅथ्यूजने श्रीलंका संघाचे प्रत्येक क्रिकेट प्रकारात प्रतिनिधित्व केले आहे. अलीकडेच तो वनडे विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतही खेळताना दिसला होता. याव्यतिरिक्त तो जगभरातील टी20 लीगमध्येही भाग घेतो.
काय म्हणाला मॅथ्यूज?
अँजेलो मॅथ्यूजनुसार, टी10सह अनेक टी20 लीग असूनही कसोटी क्रिकेटचा (Test Cricket) रोमांच कधीही कमी होणार नाही. माध्यमांतील वृत्तांनुसार त्याने म्हटले की, “मला वाटत नाही की, कसोटी क्रिकेटचे अस्तित्व संपत आहे. अनेक क्रिकेटपटू कसोटी क्रिकेटला पसंत करतात आणि माझ्यासाठी तर कसोटी क्रिकेट अव्वल क्रमांकाचा प्रकार आहे. निश्चितरीत्या टी10 आणि टी20 लीग लोकांना खूपच आकर्षित करतात, पण क्रिकेटचा खरा आत्मा कसोटी क्रिकेटच आहे. कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी मी काहीही ट्रेंड करेल. कसोटी चॅम्पियनशिप आल्यानंतर यामध्ये थोडा रंग आणि ग्लॅमरही जोडले गेले आहे. यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये एक उत्साह आला आहे.”
अबू धाबी टी10 लीगमध्ये गुरुवारी (दि. 7 डिसेंबर) तीन सामने खेळले गेले. पहिल्या सामन्यात बांगला टायगर्सने द चेन्नई ब्रेव्हजला 27 धावांनी नमवले. तसेच, दुसऱ्या सामन्यात अबू धाबी संघाने दिल्ली बुल्सला 7 विकेट्सने पछाडले, तर तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात मोरिसविले सॅम्प आर्मीने न्यूयॉर्क स्ट्रायकर्सला 6 विकेट्सने पराभूत केले. (test format is the pinnacle of cricket says all rounder angelo mathews)
हेही वाचा-
‘हा संघ वनडेपेक्षा टी20त चांगला…’, बलाढ्य संघाच्या स्टार खेळाडूचे T20 World Cup 2024पूर्वी मोठे विधान
WPL 2024 Auction: महिला खेळाडूंवर होणार कोट्यवधींची उधळण; कधी, कुठे आणि कसा पाहायचा लिलाव? घ्या जाणून