इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या महासंग्रामाचा शेवट रविवारी (दि. 28 मे) होणार आहे. या सामन्यात गतविजेता गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघ आमने-सामने असतील. नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळल्या जाणाऱ्या या अंतिम सामन्यात एमएस धोनी याच्या नेतृत्वातील सीएसके संघाने 10व्यांदा एन्ट्री केली आहे. तसेच, धोनीचाही हा आयपीएलमधील 10वा अंतिम सामना आहे. तो 2008पासून चेन्नईचा कर्णधार आहे, परंतु अंतिम सामन्यातील धोनीचा एक विक्रम भीतीदायक आहे. तो म्हणजे, धोनी एकाच कर्णधाराकडून 3 वेळा अंतिम सामन्यात पराभूत झाला आहे.
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेचा विजेता कोण बनणार हे रविवारी सिद्ध होईल. अंतिम सामन्यात महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाची टक्कर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाशी होईल. गुजरातने मागील हंगामात पदार्पण करत पहिली वहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. अशात हार्दिककडे आपल्या नेतृत्वात सलग दुसरा हंगाम जिंकण्याची संधी आहे. तसेच, धोनीचा चेन्नई संघही चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकला आहे. अशात धोनीकडे पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे.
धोनीने जर पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली, तर तो आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाची बरोबरी करेल. मुंबईने आतापर्यंत सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. मुंबईने पाचही किताब रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली जिंकले आहेत. तसेच, धोनीसाठी रोहितच आयपीएलमधील सर्वात मोठी डोकेदुखी राहिला आहे.
एका हंगामात गंभीर बनला रोडा
रोहित अंतिम सामन्यात धोनीच्या वाटेत आला नसता, तर कदाचित आज चेन्नई संघ सर्वात यशस्वी आयपीएल संघ असता. रोहित असा कर्णधार आहे, ज्याने तीन वेळा धोनीला आयपीएल जिंकण्यापासून दूर ठेवले. त्याच्याव्यतिरिक्त गौतम गंभीर (Gautam Gambhir) यानेही 2012मध्ये धोनीच्या स्वप्नांना खिंडार लावण्यात यशस्वी ठरला होता. गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाने 11 वर्षांपूर्वी आयपीएल किताब जिंकला होता. त्यावेळी केकेआरने सीएसकेला पराभूत केले होते.
तीन वेळा रोहितने मोडले स्वप्न
यानंतर रोहितने धोनीला 3 वेळा आयपीएल जिंकू दिली नाही. पहिल्यांदा 2013मध्ये रोहितच्या नेतृत्वात मुंबईने सीएसकेला अंतिम सामन्यात 23 धावांनी पराभूत केले होते. त्यानंतर 2015मध्येही रोहितने धोनीच्या आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या स्वप्नावर पाणी फेरले होते. त्यावेळी अंतिम सामन्यात मुंबईने सीएसकेला 41 धावांनी पराभूत केले होते. त्यानंतर 2019 आयपीएल हंगामातील अंतिम सामन्यातही मुंबईने सीएसकेला 1 धावेने पराभूत केले होते.
धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने आयपीएल इतिहासात दुसऱ्यांदा सर्वाधिक किताब जिंकले आहेत. त्यांनी 2010, 2011, 2018 आणि 2021 या हंगामांचा किताब आपल्या नावावर केला आहे. आता पाचव्यांदा ट्रॉफी जिंकण्याच्या सुवर्णसंधीचा धोनी दोन्ही हातांनी फायदा उचलतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (thala ms dhoni csk lost 3 ipl finals to rohit sharma mumbai indians once kkr beat csk)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सीएसके-गुजरात सामन्यात पाऊस आला तर? जाणून घ्या कोणत्या संघाला मिळणार विजेतेपद
IPL 2023 final । सीएसकेच्या ‘या’ पाच खेळाडूंपासून गुजरातने सावध राहिलेलंच बरं! एकाने ठोकल्यात 600 धावा