---Advertisement---

‘धोनी एक जादूगार, कचऱ्यालाही सोन्यात…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाने तोंडभरून केलं ‘थाला’चं कौतुक

MS-Dhoni
---Advertisement---

महेंद्र सिंग धोनी याला आज कोणत्याही परिचयाची गरज नाहीये. धोनीची गणना जगातील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये होते. त्याने भारतीय संघाला आयसीसीच्या तीन ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. त्याव्यतिरिक्त त्याने आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाला 4 वेळा ट्रॉफी जिंकून दिली आहे. धोनीच्या नेतृत्वाचे नेहमीच कौतुक केले जाते. आता यामध्ये आणखी एका माजी खेळाडूचा समावेश झाला आहे. ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन याने विश्वास व्यक्त केला की, धोनी एक जादूगार आहे, जो इतरांच्या कचऱ्यालाही सोन्यात बदलतो.

एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघ 10व्यांदा अंतिम सामन्यात पोहोचला आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला संघाची गोलंदाजी कमकुवत दिसत होती. मात्र, धोनीने त्यांच्याकडूनच सर्वोत्तम प्रदर्शन करून घेतले. फलंदाजीत अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि शिवम दुबे (Shivam Dube) यांचा ज्याप्रकारे वापर करण्यात आला, त्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

स्पर्धेत धोनी दुखापतग्रस्त गुडघा घेऊन खेळत आहे. त्याने खेळाडू म्हणून भविष्यावर निर्णय घेण्यासाठी स्वत:ला 8-9 महिन्यांचा वेळ दिला आहे. मॅथ्यू हेडन (Matthew Hayden) यांच्या मते, तो पुढील वर्षी आयपीएल खेळणार नाही.

काय म्हणाले हेडन?
माध्यमांशी बोलताना हेडन म्हणाले की, “एमएस एक जादूगार आहे. तो इतरांचा कचरा घेऊन त्याला सोन्यात बदलतो. तो खूपच कुशल आणि सकारात्कम कर्णधार आहे. त्याने खूपच रंजक गोष्ट म्हटली आहे, जी त्याची विनम्रता दर्शवते. तमिळनाडू क्रिकेट संघ आणि त्याच्या संघात किती मजबूत ताळमेळ आहे. त्याची संघाला मजबूत बनवण्याची प्रक्रियादेखील खूपच चांगली आहे. प्रत्येक लक्ष्य मिळवण्यासाठी एक प्रक्रिया असते आणि त्याने आधी भारतीय संघासोबत आणि आता सीएसकेसोबत हे करून दाखवले आहे.”

त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी सिडनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात म्हटले की, “तो पुढील वर्षी खेळणार की नाही, हे आता अप्रासंगिक आहे. मला वाटते की, तो नाही खेळणार, पण तो एमएस धोनी आहे.”

आयपीएलचा अंतिम सामना
आयपीएल 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. 28 मे) नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघ आधीच पोहोचला आहे. आता क्वालिफायर 2 सामन्यात गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स संघापैकी जो संघ जिंकेल, तो चेन्नईविरुद्ध अंतिम सामना खेळेल. यंदाची आयपीएल ट्रॉफी कोणता संघ जिंकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (thala ms dhoni takes someone elses trash and makes it treasure matthew hayden)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘लोकल स्पर्धेत त्याच्यावर बंदी घातलेली…’, लखनऊला पराभवाची धूळ चारणाऱ्या आकाशच्या भावाचे लक्षवेधी विधान
‘मी तर म्हणेल त्याची संघात…’, टी20 विश्वचषकातील विराटच्या संघातील स्थानाविषयी स्पष्टच बोलले गावसकर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---