आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चुका होणे अपेक्षित नसतात. मग ते खेळाडूंकडून असो की पंचांकडून. कारण एक चूक दोन्ही संघांना महागात पडू शकते. असाच काहीसा प्रकार भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान घडला आहे, ज्यावर माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी एक मिम शेअर करत पायखेची केल्याचे पाहायला मिळाले आहे.
माजी भारतीय फलंदाज वसीम जाफर हे स्वभावाने तर साधे आहेत. परंतु सोशल मीडियावर ते नेहमीच मजेशीर ट्विट करत आपली प्रतिक्रिया देताना दिसून आले आहेत. नुकताच पार पडलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यानंतर देखील त्यांनी एक ट्विट केले होते, जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
तर झाले असे की, पाऊस आल्यामुळे सामन्यात अडथळा निर्माण झाला होता. त्यांनतर २३ वे षटक टाकण्यासाठी फिरकीपटू जयविक्रमा गोलंदाजीला आला होता. तर सूर्यकुमार यादव फलंदाजी करत होता. सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो प्रयत्न फसला आणि पंच धर्मसेनाने वेळ न दवडता त्याला बाद घोषित केले. त्यानंतर सूर्यकुमार यादवने रिव्ह्यू घेतला होता. त्यावेळी तिसऱ्या पंचांनी अपेक्षेपेक्षा अधिक वेळ घेतला. त्यानंतर चर्चांना उधाण आले होते की, पंचांना निर्णय घ्यायला इतका वेळ का लागत आहे?
जवळपास ५ ते ६ मिनिट झाल्यानंतर पंचांनी सूर्यकुमार यादवला बाद घोषित केले. त्यानंतर सर्वच श्रीलंकन खेळाडू खुश झाले होते. तसेच हार्दिक पंड्या मैदानात यायला सज्ज देखील झाला होता. परंतु त्याचवेळी तिसऱ्या पंचांनी आपल्या निर्णय बदलला आणि त्याला नाबाद घोषित केले. हे पाहून श्रीलंकन खेळाडू पुन्हा एकदा निराश झाले होते.
Third umpire during that DRS review 🤦 thankfully right call was made in the end. #SLvIND #SuryakumarYadav pic.twitter.com/bPOfoTJ6NA
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) July 23, 2021
वसीम जाफरने मिम शेअर करत पंचांना केले ट्रोल
हे सर्व पाहून, वसीम जाफर यांनी ट्विट करत एक मिम शेअर केला आहे. ज्यामधे त्यांनी बंदूक घेऊन निशाणा साधत असलेल्या मुलीचा फोटो शेअर केला आहे. परंतु या फोटोमध्ये त्या मुलीने, ज्या डोळ्याने पाहून निशाणा साधायचा आहे तो डोळा बंद केला आहे. यावर त्यांनी कॅप्शन देत, “रिव्ह्यूच्या वेळी तिसरे पंच… धन्यवाद, शेवटी योग्य निर्णय घेण्यात आला.” वसीमने हे ट्विट करून पंचांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.(That’s how Wasim jaffer pulls the leg in style after 3rd umpire makes the mistake)
महत्त्वाच्या बातम्या-
तिसऱ्या वनडेत श्रीलंकेची भारतावर मात, तब्बल ‘इतक्या’ वर्षांनंतर मायदेशी झळकावली विजयी पताका
वनडे मालिकेनंतर आता टी२० सीरिजमध्ये श्रीलंकेला धूळ चारण्यास भारत सज्ज; पाहा पूर्ण वेळापत्रक
Video: लोकल भाषेत श्रीलंकन यष्टीरक्षकाचा गोलंदाजाला सल्ला; पुढच्याच चेंडूवर ‘अशी’ पडली संजूची विकेट