नवी दिल्ली| इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या लिलावात कोणत्याही फ्रेंचायझी संघाचा पाठिंबा नसला तरी चेतेश्वर पुजारा निराश होत नाही. जे लोक म्हणतात की तो फक्त कसोटी क्रिकेट खेळू शकतो अशा लोकांची विचारधारा त्याला बदलायची आहे.
असे बरेच खेळाडू आहेत ज्यांचा स्ट्राइक रेट (सुमारे 110) त्याच्या बरोबरीचा आहे, परंतु फ्रेंचायझी त्यांची निवड करता. पण पुजाराकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. पुजाराचा ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 109.35 चा स्ट्राईक रेट आहे.
पुजाराला विचारले गेले की टी20 खेळाडू म्हणून त्याची जागा कोणीतरी घेतल्याबद्दल त्याला वाईट किंवा अस्वस्थ वाटते का?
या प्रश्नावर तो म्हणाला, “क्रिकेटपटू असल्याने मला तसे वाटत नाही. मी असा व्यक्ती आहे जो मनात कधीच अहंकार ठेवत नाही. मी पाहिले आहे की आयपीएलचा लिलाव एक किचकट प्रक्रिया आहे.”
उदाहरणं देत पुजारा म्हणाला, “मी पाहिले आहे की हाशिम आमलासारख्या जागतिक दर्जाच्या खेळाडूंनासुद्धा लिलावात खरेदीदार मिळत नाहीत. असे बरेच चांगले टी20 खेळाडू आहेत ज्यांची निवड झाली नाही. म्हणूनच, त्यांनी मला निवडले नाही असा दंभ मला नाही. संधी मिळाल्यास मी आयपीएलमध्ये खेळणार.”
पुजाराला विचारण्यात आले, लोकांच्या मनात त्याच्याबद्दल तो फक्त कसोटी क्रिकेटपटू असल्याचा समज आहे त्यामुळे त्याला नुकसान झाले आहे असे वाटते का? त्याने स्पष्टपणे उत्तर दिले, “मी हो म्हणेन. मला कसोटीपटू असा ठप्पा लावला गेला आहे आणि मी यात काहीही करू शकत नाही.”
ऑस्ट्रेलियाच्या 2018-19 दौऱ्यात कसोटी मालिकेत 500 पेक्षा अधिक धावा करून पुजाराने भारताला 2-1 असा विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
पुढे बोलताना तो म्हणाला, “मी सुरुवातीपासूनच म्हणतो आहे की मला संधी मिळाली पाहिजे. पांढऱ्या चेंडूच्या (मर्यादित षटक) क्रिकेटमध्येही मी चांगली कामगिरी करू शकतो हे सिद्ध करण्यास मी सक्षम आहे.”
आपल्या कामगिरीबद्दल बोलताना पुजारा म्हणाला, “मी अ श्रेणी क्रिकेट (सरासरी 54), घरगुती टी -20 (मुश्ताक अली ट्रॉफीमधील शतक) मध्ये चांगली कामगिरी केली आहे. इंग्लंडमधील लिस्ट ए सामन्यात मी चांगली कामगिरी केली.”
“खेळात प्रदर्शन ही अशी एक गोष्ट आहे जी मी नियंत्रित करू शकतो आणि ते मी करीन. मी फक्त क्षणाची वाट पाहू शकतो. सर्व स्वरूपात खेळून मला आनंद होईल. जोपर्यंत मी खेळत राहतो, तोपर्यंत मी या खेळाचा विद्यार्थी राहील आणि शिकण्याची कोणतीही मर्यादा नाही, परंतु जेव्हा मला संधी मिळेल तेव्हाच मी माझ्याबद्दल असलेला समज बदलू शकतो.” असे प्रामाणिक मत पुजाराने व्यक्त केले.
आयपीएल दरम्यान पुजारा इंग्लंडमध्ये इतर वर्षांत काउंटी क्रिकेटमध्ये खेळला पण यावेळी कोव्हिड-19 साथीच्या आजारामुळे ते शक्य झाले नाही.