---Advertisement---

पाकिस्तान का नाही बनला आशिया चषक 2022 चा चॅम्पियन, कर्णधार बाबरने सांगितले कारण

On: सोमवार, सप्टेंबर 12, 2022 8:19 AM
Babar-Azam-Post-Match-Presentation
---Advertisement---

पाकिस्तान संघाला आशिया चषक 2022 च्या विजेत्या संघाच्या रूपात पाहिले जात होते, परंतु अंतिम सामन्यात श्रीलंका संघाने त्यांचा पराभूत केले आणि विजेतेपद पटकावले. पाकिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. श्रीलंकन संघाने दिलेले 171 धावांचे लक्ष्य पाकिस्तानला गाठला आले नाही. अंतिम सामना 23 धावांनी गमावल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने महत्वाची प्रतिक्रिया दिली. 

अंतिम सामना गमावल्यानंतर बाबर आझम (Babar Azam) माध्यमांशी बोलत होता. तो म्हणाला की, “अप्रतिम क्रिकेट खेळण्यासाठी श्रीलंका संघाला शुभेच्छा. आम्ही पहिल्या 8 षटकांपर्यंत त्यांच्यावर आमचे वर्चस्व कायम ठेवले होते, पण राजपक्षेने जी भागीदारी केली, ती अद्भूत होती. ही एक चांगली खेळपट्टी होती आणि दुबईत खेळणे नेहमीच चांगले असते. आम्ही आमच्या क्षमतेप्रमाणे फलंदाजी करू शकलो नाही. आम्ही चांगली सुरुवात केली, पण अजून 15-20 धावा करता आल्या नाही, म्हणून सामन्याचा शेवट देखील करू शकलो नाहीत.”

“आम्हाला खूप साऱ्या सकारात्मिक गोष्टी मिळाल्या आहेत. अंतिम सामन्यात चुका करण्याची शक्यता कमी असते. आमचे क्षेत्ररक्षम चांगले नव्हते आणि फलंदाजी करताना देखील आम्ही अपेक्षित शेवट करू शकलो नाही. परंतु मोहम्मद रिजवान, नसीम शाह आणि मोहम्मद नवाज यांनी आमच्यासाठी चांगले प्रदर्शन केले. चढ उतार तर येतच राहतील, पण आम्ही चुका कमी केल्या, तर चांगलेच होईल,” असेही बाबर पुढे बोलताना म्हणाला.

दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रीलंकन संघाच्या धावांवर पाकिस्तानला लगाव लावता आली नाही, असेच दिसते. 20 षटकांमध्ये श्रीलंकेने 6 विकेट्सच्या नुकसानावर 170 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संपूर्ण संघ 147 धावांवर गुंडाळला गेला. पाकिस्तानच्या डावातील 17 वे षटकामुळे सामन्याची दिशा पूर्णपणे बदलली. फिरकीपटू वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) या षटकात गोलंदाजीसाठी आला होता आणि त्याने पाकिस्तानच्या मोहम्मद रिजवान, आसिफ अली आणि खुशदिल शाह या तीन महत्वाच्या विकेट घेतल्या. परिणामी पाकिस्तान संघ त्यानंतर सर्वबाद झाला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

पाकिस्तानचं स्वप्न हिरावून घेणारी हसरंगाची 17वी ओव्हर, नेमकं काय घडलं?
आशिया क्रिकेटवर ‘लंकाराज’! पाकिस्तानला लोळवत श्रीलंका आशियाचे चॅम्पियन
संतापजनक! आशिया कप फायनल पाहण्यासाठी भारतीयांना ‘नो एन्ट्री’; धक्के देत काढले बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---