जगप्रसिद्ध क्रीडा वेबसाईट इएसपीएनने जगातील फेमस टाॅप १०० खेळाडूंची यादी आज जाहीर केली. यात भारताच्या विराट कोहली, रोहित शर्मा, एमएस धोनी, सायना नेहवाल आणि सुरेश रैनाचा समावेश आहे.
जगातील ६०० खेळाडूंची ६८ देशातून निवड करत त्यातून १०० खेळाडूंची यात निवड करण्यात आली. यासाठी त्यांचे सोशल माध्यमांवरील फाॅलोवर्स, त्यांची खेळ तसेच जाहीरातीतुन आलेली कमाई आणि त्यांना कोणत्याही सर्च इंजिनवर किती सर्च केले जाते हे विचारात घेण्यात आले.
यात पहिल्या स्थानावर फूटबाॅलपटू ख्रिस्तिआनो रोनाल्डो, दुसऱ्या स्थानावर बास्केटबाॅलपटू लेब्रोन जेम्स, तिसऱ्या स्थानी लिओनल मेस्सी, चौथ्या स्थानी नेमार तर महान टेनिसपटू राॅजर फेडरर पाचव्या स्थानी आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली या यादीत ११व्या स्थानी आहे. त्याचा सर्च स्कोर ८८ आहे तर त्याची एकुण कमाई १७.४ मिलीयन डाॅलर आहे. सोशल माध्यमांवर त्याला ३६.४ मिलीयन फाॅलोवर्स आहेत.
कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला कॅप्टन कूल एमएस धोनी या यादीत २०वा, रोहित शर्मा ३०व्या स्थानी, सुरेश रैना ४१व्या स्थानी, सायना नेहवाल ५०व्या, युवराज सिंग ५७व्या, आर अश्विन ७१व्या, हरभजन सिंग ८०व्या, गौतम गंभीर ८३व्या, शिखर धवन ९४व्या तर एबी डिविलियर्स ९९व्या स्थानी आहे.
या १०० खेळाडूंच्या यादीत १० भारतीय खेळाडू आहेत.
जगातील टाॅप टेन फेमस खेळाडू-
१-ख्रिस्तिआनो रोनाल्डो
२- लेब्रोन जेम्स
३- लिओनल मेस्सी
४-नेमार
५-राॅजर फेडरर
६- टायगर वुड्स
७- केविन डुरांट्
८- राफेल नदाल
९-स्टिफन करी
१०-फिल मायक्लेसन
जगातील टाॅप टेन फेमस खेळाडूंमधील भारतीय खेळाडू-
११- विराट कोहली
२०- एमएस धोनी
३०- रोहित शर्मा
४१- सुरेश रैना
५०- सायना नेहवाल
५७- युवराज सिंग
७१- आर अश्विन
८०- हरभजन सिंग
८३- गौतम गंभीर
९४- शिखर धवन
महत्त्वाच्या बातम्या-
–सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यापर्यंत पोहचलेला एबी!
-आयपीएल 2018 मध्ये या 6 खेळाडूंची आहे गोलंदाजांमध्ये दहशत
-सचिन, रोहितनंतर मोठा पराक्रम करण्याची संधी मुंबईकर रहाणेकडून हुकली!
-भारतीयांचं सर्वाधिक प्रेम मिळालेला परदेशी खेऴाडू आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!