पुणे, दि. 23 डिसेंबर 2023 – पुण्यातील संघांकडून भरघोस प्रतिसाद लाभलेल्या गुरू तेगबहादुर फुटबॉल स्पर्धेला 22 वर्षे पूर्ण झाल्यामुळे आणि गुरू श्री तेगबहादुर यांच्या हौतात्म्याला 348 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून संयोजक गुरू तेगबहादुर फाऊंडेशन यांच्या वतीने 22व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा रेंजहिल्स स्पोर्ट्स मैदान, खडकी येथे 24 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत रंगणार आहे.
पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना गुरू तेगबहादुर फाऊंडेशनचे अध्यक्ष एस. एस. अहलुवालिया म्हणाले की, हि स्पर्धा द्वितीय व तृतीय श्रेणी संघांबरोबर वरिष्ठ व सुपर लीग दर्जाच्या संघांना ही स्पर्धा खुली असणार आहे. या स्पर्धेला शहरातील संघाकडून भरघोस प्रतिसाद मिळत असल्यामुळे या स्पर्धेचा स्तर वर्षागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे यावर्षीहीशहरातील फुटबॉलपटूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार आहे.
यावेळी रजिंदरसिंग वालिया, पीडीजी लायन एमजेएफ सीए अभय शास्त्री, चरणजित सिंग सहानी, संतसिंग मोखा, पीडीएफएचे उपाध्यक्ष मंदार ताम्हाणे, लायन रानी अहलूवालीया आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत साई एफसी, नवमहाराष्ट्र एफसी, दुर्गा एफसी, केएमपी इलेव्हन, सिटी एफसी, राहुल एफसी, खडकी ब्लुज, कर्कियन्स, यूकेएम एफसी, आयफा एफसी, रुपाली इलेव्हन, आर्यन्स एफसी, परशूरामीयन्स एफसी, रेंज हिल्स यंग बॉईज, मॅथ्यु एफसी, अशोका इलेव्हन, सिग्मय एफसी या संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला आकर्षक रोख पारितोषिकांबरोबर फुटबॉल, बॅग, पदके देण्यात येणार असून सर्व सहभागी संघाच्या खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (The 22nd Guru Teg Bahadur Gold Cup football tournament started on Sunday)
महत्वाच्या बातम्या –
IND vs SA । कसोटी मालिकेआधी टीम इंडियाची सेंच्युरियन भ्रमंती! शर्मा फॅमिलीही होती सोबत
याला क्रिकेट ऐसे नाव! विजेत्या टीम इंडियाचा ॲास्ट्रेलियाच्या कर्णधारानेच काढला फोटो, मन जिंकणारा Video पाहाच