भारतीय क्रिकेटचा इतिहास दिग्गज खेळाडूंनी भरलेला आहे. भारतीय क्रिकेट इतिहासात, आतापर्यंतचा अनेक महान आणि दिग्गज खेळाडू झाले आहेत. प्रत्येक दशकात दिग्गज फलंदाज किंवा दिग्गज खेळाडूंची मोठी नावं आहेत. ज्यांचा भारतीय क्रिकेटमध्ये हा एक मोठा सन्मान आणि आदर आहे.
सुनील गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड किंवा सौरव गांगुली तसेच आताचे एमएस धोनीला किंवा इतर यांना खूप मान-सन्मान मिळाला आहे.
त्याच्या उलट, असे काही खेळाडू आहेत, ज्यांनी आपल्या देशाच्या क्रिकेट संघासाठी जबरदस्त कामगिरी केली आणि उत्कृष्ट कारकीर्द केली परंतु या खेळाडूंना अपेक्षित असा सन्मान मिळाला नाही. तर या लेखात जणून घेणार आहोत भारतीय क्रिकेटचे ते ३ दिग्गज ज्यांना त्यांचा सन्मान मिळाला नाही.
भारताचे ३ दिग्गज खेळाडू ज्यांना त्यांचा अपेक्षित सन्मान मिळाला नाही.
१. वीरेंद्र सेहवाग
माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागसारखा आक्रमक फलंदाज भारताने यापूर्वी कधीच पाहिला नाही. फलंदाजीच्या वेगळ्या शैलीमुळे वीरेंद्र सेहवागचे नाव केवळ भारतीय क्रिकेटमधेच नव्हे तर जागतिक क्रिकेटमध्येही आदराने घेतले जाते. वीरेंद्र सेहवागने भारतीय क्रिकेट संघासाठी तिन्ही प्रकारात खेळले आहे, ज्यात त्याने कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये ८ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. तर त्याने कसोटीत दोन तिहेरी शतके आणि वनडे सामन्यात दुहेरी शतक ठोकल आहे.
पण त्याने संघासाठी दिलेल्या या महत्वपूर्ण योगदानाबद्दल भारतीय क्रिकेटमध्ये त्याला योग्य सन्मान मिळाला नाही. त्याला निवृत्तीचा सामना खेळण्याची संधीही मिळू शकली नाही.
२. व्हीव्हीएस लक्ष्मण
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एक महान फलंदाज म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण नाव घेतले जाते. या भारतीय माजी फलंदाजाला कसोटी क्रिकेटमधील असंख्य मॅच-विनिंग आणि मॅच सेव्हिंग इनिंगसाठी ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’ म्हणून ओळखले जाते.
भारतीय संघासाठी कसोटीत व्हीव्हीएस लक्ष्मणला एक विशेष शस्त्र मानले जात असे. व्हीव्हीएस लक्ष्मणने आपल्या कारकीर्दीतील काही कठीण परिस्थितींमध्ये उत्कृष्ट खेळी खेळली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मणने भारतीय क्रिकेटमध्ये अभूतपूर्व योगदान दिले आहे, परंतु त्याला त्याच्या कारकीर्दीत सचिन-गांगुली किंवा द्रविड यांसारखा सन्मान मिळाला नाही. लक्ष्मणलाही मैदानाबाहेरच निवृत्तीचा निर्णय घ्यावा लागला.
३. अनिल कुंबळे
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात काही अद्वितीय गोलंदाज आहेत. ज्यांनी आपल्या गोलंदाजीने फलंदाजांनाही त्रास दिला आणि भरपूर विकेट्स मिळवले. अशा दुर्मिळ खेळाडूंमध्ये भारताचा महान फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेच नाव आवर्जून घेतले जाते.
अनिल कुंबळे हा भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे, तसेच तो जगातील सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे.
अनिल कुंबळेने आपल्या कारकीर्दीत चमकदार कामगिरी करत एक वेगळी प्रतिमा निर्माण केली. पण अनिल कुंबळेच्या उल्लेखनीय योगदानानंतरही त्यांना मोठ्या दिग्गजांचा मान कधीच मिळाला नाही.
ट्रेंडिंग लेख –
भारताविरुद्ध वनडेत सर्वाधिक शतक ठोकणारे ४ फलंदाज
४०० पेक्षा जास्त टी२० सामने खेळणारे ३ खेळाडू; तिघेही आहेत एकाच संघातील
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलपूर्वी चाहत्यांना लुटता येणार या लीगचा आनंद; वेळापत्रकाची झाली घोषणा
वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेतील विजयाचा फायदा; इंग्लंडने गुणतालिकेमध्ये घेतली मोठी झेप
५०० कसोटी विकेट्स घेणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडच्या या ५ विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही