कसोटी क्रिकेट हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सर्वात मोठा व जुना प्रकार आहे. कसोटीमध्ये कित्येक तास फलंदाजांना खेळपट्टीवर टिकून चांगली कामगिरी करावी लागते. विरुद्ध संघातील गोलंदाजांचा सामना करत अधिकाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांकडे कसोटी क्रिकेटमध्ये सन्मानाने पाहिले जाते. अनेक दिग्गज फलंदाजांनी एका कसोटी सामन्यात ३०० पेक्षा जास्त धावा करण्याचा कारनामा केला आहे. इंग्लंडचे माजी सलामीवीर फलंदाज ग्राहम गूच यांनी एका कसोटी सामन्यात सर्वाधिक ४५६ धावा करण्याचा पराक्रम केला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये अमर्यादित षटके असल्यामुळे फलंदाजांना द्विशतक, त्रिशतक करण्याची संधी असते. भारतीय संघातील फक्त २ खेळाडूंनी कसोटीमध्ये त्रिशतक केले आहे. एक म्हणजे विरेंद्र सेहवाग. ज्याने २ वेळा कसोटीमध्ये त्रिशतक ठोकले आहे. तर दुसरा म्हणजे करुण नायर. ज्याने एक वेळा कसोटीमध्ये त्रिशतक ठोकले आहे. पण, असेही काही फलंदाज आहेत, ज्यांनी कसोटी सामन्याच्या एका डावात ३५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यातील ब्रायन लारा यांनी कसोटी सामन्याच्या एका डावात तब्बल ४०० धावा करण्याचा पराक्रम केला आहे.
चला तर जाणून घेऊयात, कोण आहेत ते ५ फलंदाज ज्यांनी कसोटी सामन्याच्या एका डावात ३५० पेक्षा जास्त धावा करण्याचा कारनामा केला आहे. (5 Batsman Smashed More Than 350 Runs In Test Inning) –
५. लेन हटन {३६४} –
इंग्लंडचे दिग्गज सलामीवीर फलंदाज लेन हटन यांचा या यादीत ५वा क्रमांक लागतो. त्यांनी २० ऑगस्ट १९३८ला ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात एका डावात ३६४ धावा केल्या होत्या. यात त्यांच्या ३५ चौकारांचा समावेश होता. त्यांच्या या दमदार खेळीमुळे इंग्लंडने तो सामना एका डाव आणि ५७९ धावांनी जिंकला होता.
४. गॅरी सोबर्स {३६५} –
२६ फेब्रुवारी १९५८ ला पाकिस्तानविरुद्ध किंग्स्टन येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात गॅरी सोबर्स यांनी दमदार प्रदर्शन केले होते. यावेळी सामन्यातील पहिल्या डावात सोबर्स यांनी नाबाद ३६५ धावा केल्या होत्या. त्यांच्या या शानदार खेळीमुळे वेस्ट इंडिजने तो सामना एका डाव आणि १७४ धावांनी जिंकला होता.
३. माहेला जयवर्धने {३७४} –
श्रीलंकेचा दमदार फलंदाज माहेला जयवर्धनेने २७ जुलै २००६ला दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या कसोटी सामन्यात दमदार खेळी केली होती. यावेळी त्याने कोलंबो येथील सामन्यातील एका डावात ३७४ धावांची खेळी केली होती. श्रीलंकाने तो सामना एका डाव आणि १५३ धावांनी जिंकला होता. जयवर्धने त्या सामन्यात सामनावीर बनला होता.
२. मॅथ्यू हेडन {३८०} –
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज मॅथ्यू हेडनने ९ ऑक्टोबर २००३ला झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी सामन्यात एका डावात ३८० धावा केल्या होत्या. यात त्याच्या ३८ चौकारांचा आणि ११ षटकारांचा समावेश होता. त्याच्या या अफलातून खेळीने ब्रायन लाराचा ९ वर्षांपासून कायम असलेला ३७५ धावांचा विक्रम मोडला होता. तो सामना ऑस्ट्रेलियाने १ डाव १७५ धावांनी जिंकला होता. त्या सामन्यात हेडन सामनावीर ठरला होता.
१. ब्रायन लारा {३७५, नाबाद ४००} –
वेस्ट इंडिजचा धुरंधार फलंदाज ब्रायन लाराने २ वेळा कसोटी सामन्याच्या एका डावात ३५० पेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम केला आहे. शिवाय, कसोटी सामन्याच्या एका डावात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो अव्वल क्रमांकावर विराजमान आहे. १६ एप्रिल १९९४ला इंग्लंडविरुद्ध सेंट जोन्स येथे झालेल्या कसोटी सामन्यातील एका डावात लाराने ३७५ धावा केल्या होत्या. त्याचा हा विक्रम अनेक वर्षे अबाधित होता. पण, पुढे २००३मध्ये मॅथ्यू हेडनने लाराचा विक्रम मोडला.
पण, लाराने १० एप्रिल २००४ला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात सर्वाधिक नाबाद ४०० धावा करत परत तो विक्रम आपल्या नावावर केला. यावेळी लाराने सर्वाधिक नाबाद ४०० धावा केल्या होत्या. त्याचा हा विक्रम अजुनही अबाधित आहे.
ट्रेंडिंग लेख –
२५०पेक्षा जास्त वनडे सामने खेळूनही या ५ खेळाडूंवर कर्णधारपद…
आख्ख्या कसोटी करियरमध्ये एकही षटकार फलंदाजाला मारु न देणारे महारथी
धीरज जाधव- गुणवत्ता असून देशासाठी खेळू न शकलेला महाराष्ट्राचा महारथी
महत्वाच्या बातम्या –
आयपीएलचे आयोजन यूएईत ३ ठिकाणी झाल्याने मॅच फिक्सिंगला बसेल आळा, पहा काय आहेत सुविधा
युएईत होणाऱ्या आयपीएल २०२० मध्ये हे ४ संघ करु शकतात प्लेऑफमध्ये प्रवेश
फक्त क्षेत्ररक्षणासाठी मिळाला होता मॅन ऑफ द मॅच, सुवर्णाक्षरांनी लिहीले गेले नाव