अर्जेंटिना फुटबॉल संघ मागच्या रविवारी (18 डिसेंबर) फीफा विश्वचषकाचा विजेता बनला. कर्णधार लिओनेल मेस्सी याने अर्जेंटिनासाठी 36 वर्षांनंतर फीफा विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्स संघाला पराभूत केले आणि इतिहिसातील तिसरा फीफा विश्वचषक जिंकला. विश्वचषक जिंंकल्यानंतर सर्वत्र मेस्सीची चर्चा सुरू आहे. अशातच आता अर्जेंटिना देशाच्या नोटांवर मेस्सीचा फोटो झापला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
लिओनल मेस्सी (Leonel Messi) फुटबॉल विश्वतील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक राहिला आहे. जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक मेस्सी फ्रान्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात दोन गोल करू शकला आणि पेनल्टी शुटआउटमध्ये संघाला विजय देखील मिळवून दिला. विश्वचषक जिंकल्यानंतर जगातील वेगवेगळ्या भागांमध्ये त्याच्या चाहत्यांकडून मेस्सीचे कौतुक केले जात आहे. अशातच अर्जेंटिनाच्या नोटांवर त्याचा फोटो छापला जाणार असल्याची बातमी समोर आली. फायनेंसिएरो या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, “1000 पेसोच्या नोटांवर लिओनल मेस्सीचा फोटो लावला जाणार आहे. कारण हा आकडा 10 च्या पटीत असावा असेल अधिकाऱ्यांना वाटते.” मेस्सीच्या जर्सीचा क्रमांक देखील 10 आहे आणि याच कारणास्तव हा निर्णय घ्यावा अशी अधिकाऱ्यांची अच्छा असल्याचे सांगितले गेले आहे.
अर्जेंटिनाच्या माध्यमांमध्ये सध्या ही बातमी चांगलीच व्हायरल झाली आहे. ही माहिती व्हायरल झाल्यानंतर माध्यमांनी नंतर अशीही माहिती दिली की, हा प्रस्ताव अर्जेंटिनाच्या सेंट्रल बँकेच्या अधिकाऱ्यांनी मजेत मांडला होता. असे असले तरी, बँकेचे डायरेक्टर लिसेंड्रो क्लेरी आणि एडआर्डो हेकर या प्रस्तावाशी समहत असल्याचेही सांगितले जात आहे. या नवीन टोकांमुळे अर्जेंटिनातील लोकांमध्ये एकोप्याच्या भावनेला पुन्हा बळ मिशेल, असे बँकेच्या दोन्ही डायरेक्ट्सला वाटत आहे. अशात याविषयी बँक आणि अर्जेंटिना सकराल काय निर्णय घेणार, हे लवकरच समोर येऊ शकते. सोशल मीडियावर सध्या हे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.
https://twitter.com/Ferdous79310234/status/1605882880957169665?s=20&t=n_qDpgYYBprSkk7L8G3K8Q
Argentina are considering putting Lionel Messi on their banknotes 🤯💵 pic.twitter.com/iNpU92OFah
— Leo Messi 🔟 Fan Club (@WeAreMessi) December 21, 2022
दरम्यान, मेस्सीच्या नेतृत्वातील अर्जेंटिनाने फीफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फ्राँसला पेनल्टी शुटआउटमध्ये मात दिला. त्याआधी सामन्याच्या निर्धारित वेळेत दोन्ही संघ 3-3 अशा बरोबरीवर होते. पेनल्टी शुटआटमध्ये मात्र अर्जेंटिनाने आघाडी घेत 4-2 असा विजय मिळवला. विजयानंतर जर मेस्सीचा फोटो अर्जेंटिनाच्या नोटांवर झापला गेला, तर असे होण्याची ही पहिली वेळ नसेल. यापूर्वी 1978 मध्ये अर्जेंटिना संघाने पहिला विश्वचषक जिंकला, तेव्हा त्यांच्या सकरारने खास ठोकळे झापले होते. (The Argentine government will stamp Lionel Messi’s photo on its banknotes )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
युवा खेळाडूंवर भडकले कपिल देव; म्हणाले, ‘दबाव झेपत नसेल, तर केळी विका’
पुजारा-विराटच्या सरासरीबाबत अजिंक्य रहाणेचा खळबळजनक खुलासा; म्हणाला, ‘भारतीय खेळपट्ट्या…’